VIDEO: करवीरनिवासीनी श्री अंबाबाईची मयूरवाहिनी कौमारीमाता रुपात पुजा.

By Admin | Published: October 2, 2016 06:32 PM2016-10-02T18:32:39+5:302016-10-02T18:32:39+5:30

शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला करवीरनिवासीनी श्री अंबाबाईची मयूरवाहिनी कौमारीमाता रुपात पुजा बांधण्यात आली .रविवारी सकाळी अंबाबाईचा

VIDEO: Pooja as Karabiramati's Mayurvahini Kouramiata | VIDEO: करवीरनिवासीनी श्री अंबाबाईची मयूरवाहिनी कौमारीमाता रुपात पुजा.

VIDEO: करवीरनिवासीनी श्री अंबाबाईची मयूरवाहिनी कौमारीमाता रुपात पुजा.

googlenewsNext

कोल्हापूर, दि : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला करवीरनिवासीनी श्री अंबाबाईची मयूरवाहिनी कौमारीमाता रुपात पुजा बांधण्यात आली .रविवारी सकाळी अंबाबाईचा शासकीय अभिषेक पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दुपारच्या आरतीनंतर देवीची श्री मयूरवाहीनी कौमारीमाता रुपात पुजा बांधण्यात आली.

महालक्ष्मी देवीच्या प्रधान नवशक्तीमधील श्री कौमारीदेवी ही एक शक्ती आहे. रक्तबीज किंवा महिषासुरादिकांच्या वधासाठी सर्व देवांच्या तेजसारांमधून श्री महादेवी प्रकटली. त्या प्रत्येक देवाच्या अंशानूसार, स्वरुपानूसार ही महासेनानी कार्तिकेयाची च्मयुरारुढ कौमारी शक्ती आहे. श्री देवीस अत्यंत प्रिय असणा-या कुमारीपूजनात दोन वर्षाच्या कन्येला कौमारी अथाव कुमारी देवी म्हणतात.

या देवीच्या उपासनेने आयुष्य व बल वृद्धि होते. रविवारी असल्याने अडीच लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ही पूजा निलेश ठाणेकर, ऋषिकेश ठाणेकर, अमित दिवाण, श्रीनिवास जोशी यांनी बांधली. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी
काढण्यात आली.
 
 
पाहा व्हिडीओ-
 

Web Title: VIDEO: Pooja as Karabiramati's Mayurvahini Kouramiata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.