VIDEO : अकलूज बंदची तीव्रता वाढली, समर्थकांचा शहरात राडा
By Admin | Published: August 26, 2016 06:14 PM2016-08-26T18:14:04+5:302016-08-26T18:16:32+5:30
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केलेल्या कामाची तत्कालीन कोनशिला तोडून टाकल्याच्या तीव्र निषेध व्यक्त करीत अकलूज
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.25 - माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केलेल्या कामाची तत्कालीन कोनशिला तोडून टाकल्याच्या तीव्र निषेध व्यक्त करीत अकलूज शहरासह माळशिरस व परिसरातील गावात बंद पाळण्यात आला. मात्र दुपारनंतर अकलूज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विजयसिंह पाटील यांच्या समर्थकांनी अनेक महत्वाच्या रस्त्यांवर टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला. त्यामुळे काही मार्गावरील वाहतुक बंद झाली होती़.
सध्या निषेध नोंदविण्यासाठी अकलुजसह शंकरनगर, श्रीपुर, माळेवाडी, संग्रामनगर,पिलीव, बोंडले, श्रीपूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. माळशिरस तालुका पंचायत समितीच्या नुतन इमारत लोकार्पण कार्यक्रमानिमित्ताने विरोधकांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा भुमिपुजनाचा कोनशिला (फलक) काढला म्हणून राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करुन तालुका बंदचा निर्णय घेतला आहे. सकाळपासूनच अकलूज शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
अकलुज निमगाव रस्ता, पुणे-पंढरपूर रस्ता बंद करण्यात आला आहे. या संपूर्ण गोंधळामुळे अकलूज शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़