VIDEO : शिवलिंगासारख्या दिसणा- या झाडाच्या बुंध्याची पूजा
By admin | Published: August 29, 2016 03:47 PM2016-08-29T15:47:39+5:302016-08-29T15:47:39+5:30
मालेगाव तालुक्यातील ग्राम जऊळका रेल्वेजवळ असलेल्या एका लिंबाच्या झाडाचा बुंधा उघडा पडला आहे. सदर बुंधा शिवलिंगासारखा दिसत असल्याने काही नागरिकांनी
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 29 - मालेगाव तालुक्यातील ग्राम जऊळका रेल्वेजवळ असलेल्या एका लिंबाच्या झाडाचा बुंधा उघडा पडला आहे. सदर बुंधा शिवलिंगासारखा दिसत असल्याने काही नागरिकांनी येथे गर्दी करुन त्याची पूजा - अर्चा करणे सुरु केले आहे.
जग एकीकडे आधुनिकतेकडे जात असतांना आजही अंधश्रध्देचे लोण कमी होता होत नसल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे. जऊळका रेल्वे नजिक एका शेतात लिंबाचे झाड आहे. येथे काही जणांना काम करीत असतांना झाडाच्या बुंध्याकडे लक्ष गेले असता ते भगवान शंकराच्या पिंडीसारखे दिसले. ही बाब त्याने एकमेकांना सांगण्यास सुरुवात केली. ही गोष्ट वा-यासारखी पसरल्याने श्रावणातील आज शेवटचा सोमवार या दिवशी नागरिकांनी अगरबत्ती लावून पूजा केल्याचे दिसून आले.