VIDEO : पुण्यात आईमुलांना गाडीखाली चिरडणा-या "त्या" महिलेला अटक
By admin | Published: April 18, 2017 11:53 AM2017-04-18T11:53:32+5:302017-04-18T16:17:03+5:30
बेदरकारपणे वाहन चालवून एका महिलेसहीत तिच्या दोन चिमुकल्या मुलांना गाडीखाली चिरडणा-या कार चालक आरोपी महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - बेदरकारपणे वाहन चालवून एका महिलेसहीत तिच्या दोन चिमुकल्या मुलांना गाडीखाली चिरडणा-या कार चालक आरोपी महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपी महिलेचं नाव सुजाता जयप्रकाश श्रॉफ असे आहे. दुर्घटनेत ही महिलादेखील जखमी झाली होती. तिला पूना हॉस्पिटलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाणेर येथे सोमवारी (17 एप्रिल) हा भीषण असा अपघात घडला.
आरोपी महिला चालक सुजाता जयप्रकाश पुण्याहून बालेवाडीच्या दिशेने जात असताना बाणेर येथे तिचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुभाजकावर उभ्या असणा-या एका महिलेसहीत तिच्या दोन मुलांना तिनं उडवले. ज्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला, तर त्यांची पूजा विश्वकर्मा या गंभीर झाल्या होत्या.
दरम्यान, पूजा यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
कसा घडला अपघात?
बाणेर येथे रस्त्यावर दुभाजकावर दोन मुलांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलं आईसोबत डी-मार्टमधून खरेदी करून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना दुभाजकावर असलेल्या तिघांना कारनं धडक दिली. सोमवारी (17 एप्रिल) दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपली आई पूजा विश्वकर्मासोबत डी मार्टमधून घरी परतत होती.
रस्ता ओलांडताना गाड्यांची ये-जा सुरू असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या गाडीनं त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलांची आई गंभीर जखमी झाली होती. मुलांना धडक देणा-या कारमधील चालक महिला होता. ही महिला पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती.
बाणेरमध्ये आल्यावर तिचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तिनं दुभाजकावरील तिघांना जोरदार धडक दिली. ती एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली.