VIDEO - नवी मुंबईत हळदीच्या कार्यक्रमात राडा, पोलिसांनी केला लाठीचार्ज
By admin | Published: April 20, 2017 08:12 AM2017-04-20T08:12:27+5:302017-04-20T11:09:56+5:30
पर खैराणे गावात हळदीच्या कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत डीजे सुरु असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 20 - कोपर खैराणे गावात हळदीच्या कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत डीजे सुरु असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत नवरदेवाच्या आई वडीलांसह पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.
बुधवारी रात्री कुंदन गणेश म्हात्रे याचा हळदीचा कार्यक्रम कोपर खैराणे सेक्टर १९ येथे सुरु होता. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत त्याठिकाणी डीजे सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोपर खैराणे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन डीजे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून झालेल्या वादातून पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये काहीजण जखमी झाले.
हळदीच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी एका पोलिसाला बंधन बनवले होते. त्या पोलिसांच्या सुटकेसाठी लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. डीजे वाजवायला रात्री १० पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु रात्री अडीज वाजताही तिथे डीजे सुरु असल्याची तक्रार आली होती.
यानुसार गस्ती पथकाने तिथे जाऊन व्हिडीओ शूटिंग व आवाजाची क्षमता मोजण्याला सुरुवात केली असता काही मद्यपी तरुणांनी त्यांना विरोध केला. शिवाय इतरही महिला व पुरुषानी पोलिसांची गाडी अडवून धरली. कोपर खैराणे गावात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी कोणतीही सूचना न देता लाठीचार्ज केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.