VIDEO- रमेश कदमला १६ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

By Admin | Published: January 2, 2017 06:03 PM2017-01-02T18:03:33+5:302017-01-02T18:12:22+5:30

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 2 - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आमदार रमेश ...

VIDEO-RAMESH Kadam gets judicial custody till January 16 | VIDEO- रमेश कदमला १६ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

VIDEO- रमेश कदमला १६ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Next

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 2 - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आमदार रमेश कदम यास सोलापूर जिल्हा न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पोलीस कोठडीत पोलिसांनी जाणीवपूर्वक छळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार आ. रमेश कदम याला न्यायालयासमोर केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बुधवार २८ डिसेंबर २०१६ रोजी सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून आमदार कदम याला ताब्यात घेतले. गुरूवार २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता आ. रमेश कदम यांना न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर पुन्हा आ. रमेश कदम यास सोमवार २ जानेवारी २०१७ रोजी तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने कदम यांना १६ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या वेळी आमदार कदम यांनी न्यायालयासमोर स्वत: म्हणणे मांडताना सांगितले की, पोलीस कोठडीत असताना मला अपमानास्पद वागणूक दिली असून, माझा छळ केला, असा रमेश कदमने केला. याविरोधात मी उच्च न्यायालय आणि मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. यानंतर आ. कदम याला मेडिकल चेकअप करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर कोठडीत रवानगी करण्यात आली. यावेळी रुग्णालय परिसरात रमेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती़ त्यामुळे पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता. 
-----------------------------
काय आहे प्रकरण
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयातून 11 लाख 75 हजार रुपये सुनील सुभाष चव्हाण या नावाने सोलापूर कार्यालयाला पाठविले होते. ती रक्कम आमदार कदम याच्या मोहोळ येथील कार्यालयात काम करणाऱ्या सुनील बचुटे याने काढून घेऊन वाहन खरेदी केले. या गुन्ह्यात बचुटेसह आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. चौकशीदरम्यान महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यालाही आरोपी करण्यात आले आहे.

https://www.dailymotion.com/video/x844n0f

Web Title: VIDEO-RAMESH Kadam gets judicial custody till January 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.