VIDEO : राज ठाकरेंच्या प्रकल्पाची रतन टाटांनी केली पाहणी

By Admin | Published: January 30, 2017 10:59 AM2017-01-30T10:59:56+5:302017-01-30T13:27:38+5:30

 ऑनलाइन लोकमत नाशिक, दि 30 - मनसेची सध्या शहरात बिकट अवस्था असून राज ठाकरे यांच्याकडून  'नाशिक ब्रॅण्डिंग' करण्यावर भर ...

VIDEO: The Rat Thana's proposal for Raj Thackeray's project | VIDEO : राज ठाकरेंच्या प्रकल्पाची रतन टाटांनी केली पाहणी

VIDEO : राज ठाकरेंच्या प्रकल्पाची रतन टाटांनी केली पाहणी

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि 30 - मनसेची सध्या शहरात बिकट अवस्था असून राज ठाकरे यांच्याकडून  'नाशिक ब्रॅण्डिंग' करण्यावर भर दिला जात आहे. राज ठाकरे यांनी यासाठी आज थेट देशातील मोठे उद्योजक रतन टाटा यांनाच नाशिक भेटीसाठी निमंत्रित केले. राज ठाकरे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रतन टाटा यांना घेऊन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनऔषधी उद्यानात घेऊन दाखल झाले.   
 
बोटॅनिक गार्डन प्रकल्प पाहून प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया यावेळी रतन टाटा यांनी दिली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा यांनी नाशिककरांच्यावतीने टाटा यांचे स्वागत केले. यावेळी राज यांनी टाटांसोबत मिनी इको फ्रेंडली ओपन कारमधून उद्यानात फेरफटकाही मारला. उद्यानातील आशियाई, आफ्रिकन हत्तीच्या प्रतिकृतीची टाटा यांनी यावेळी पाहणी केली   तसेच 'अरण्य कथा' व 'लेझर शो'ची माहिती जाणून घेतली. 
 
हा प्रकल्प भविष्यात उदाहरण बनेल - रतन टाटा
बोटॅनिकल गार्डन प्रकल्प खूप चांगला, नाविन्यपूर्ण असून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीनुसार टाटा ट्रस्टने समाजाला निसर्गाच्या जवळ आणण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे.  भविष्यात हा प्रकल्प एक उदाहरण म्हणून समोर येईल. 
 
(फोटो - निलेश तांबे)
 
 
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844q67

Web Title: VIDEO: The Rat Thana's proposal for Raj Thackeray's project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.