Video: शिवसेनेचे खासदार भर बैठकीत मास्क काढून शिंकले; नितेश राणेंनी शद्बांत 'चोपले'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:47 PM2020-11-02T17:47:02+5:302020-11-02T17:49:24+5:30
Nitash Rane targets MP Vinayak Raut : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका बैठकीत त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत देखील होते. महत्वाचे म्हणजे दोघांनीही मास्क घातले होते.
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आमदार पूत्र नितेश राणे आणि शिवसेना यांच्यात नेहमीच 'बाण' सुटत असतात. नितेश राणे नेहमी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर टीका करतात, तर शिवसेनेचे नेते त्यांना प्रत्यूत्तर देत असतात. मध्यंतरीच्या कोरोना काळात कोकणातील परंतू मुंबईत राहणाऱ्या लोकांवरूनही राजकारण रंगले होते. आता पुन्हा कोरोनावरून टोलेबाजी रंगली आहे. निमित्त ठरले ते म्हणजे रत्नागिरी-सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका बैठकीत त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत देखील होते. महत्वाचे म्हणजे दोघांनीही मास्क घातले होते. सत्तार बोलत असताना बाजुला बसलेल्या विनायक राऊतांना शिंक आली. तोंडा, नाकावाटे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिक मास्क घालतात. मात्र, राऊत यांनी शिंक येताच नेहमीच्या सवयीप्रमाणे हात समोर धरला. यावेळी त्यांनी एकच चूक केली, शिंक येताना त्यांना मास्क काढला आणि नाका-तोंडासमोर हात धरला व पुन्हा मास्क घातला. नेमका हाच व्हिडीओ आमदार नितेश राणे यांनी पोस्ट करत निशाना साधला आहे.
'' हे रत्नागिरी सिंधुदूर्गचे खासदार! एकदा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे? अशा मुर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे'' असा सणसणीत टोला लगावला आहे.
दरम्यान, महसूल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे काल संध्याकाळी उशिरा माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह वेंगुर्ले रेडी बंदराची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र रेडी पोर्ट कंपनीचे अधिकारी वगळता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अब्दुल सत्तार संतापले होते.
This is Ratnagiri Sindhdurg MP!
— nitesh rane (@NiteshNRane) November 2, 2020
He shud he asked why is he wearing that mask?
God save my Kokan from such fools🙏🏻 pic.twitter.com/4cb77lFVrH
घरबांधणीचे अधिकार पुन्हा ग्राम पंचायतींना
घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात यासंबंधी घोषणा केली होती. फडणवीस सरकारने घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन टाऊन प्लानिंगकडे (जिल्हा स्तरावर) दिले होते. त्यामुळे ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाला विरोध केला होता. महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्द केला. आता घर बांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केली.