VIDEO - नवीन नोटांना नोटा मोजणाऱ्या यंत्राचा रेड सिग्नल

By Admin | Published: November 17, 2016 05:34 PM2016-11-17T17:34:15+5:302016-11-17T17:34:15+5:30

मयूर गोलेच्छा लोणार, दि. 17 : सराफा व्यवसायीकांसह पतसंस्था, सोसायट्या, आडते, व्यापारी, होलसेल व्यवसायीकांच्या दुकानात असलेल्या नोटा मोजण्याच्या यंत्रात ...

VIDEO - The Red Signal of the Note Measurement Machine on New Notes | VIDEO - नवीन नोटांना नोटा मोजणाऱ्या यंत्राचा रेड सिग्नल

VIDEO - नवीन नोटांना नोटा मोजणाऱ्या यंत्राचा रेड सिग्नल

Next

मयूर गोलेच्छा
लोणार, दि. 17 : सराफा व्यवसायीकांसह पतसंस्था, सोसायट्या, आडते, व्यापारी, होलसेल व्यवसायीकांच्या दुकानात असलेल्या नोटा मोजण्याच्या यंत्रात नविन २००० आणि ५०० रूपयांच्या नोटा मोजताना सदर नोटा बनावटी असल्याचे यंत्र
दर्शवत आहे. नोटा जरी खऱ्या असल्या तरी नोटा मोजण्याच्या यंत्रात चलनात आलेल्या नविन नोटा तपासताना ह्यरेड सिग्नलह्ण दर्शवून त्या बनावटी असल्याचे दर्शवत असल्याने व्यावसायिकांचे मात्र लाईट लागले आहे.

५००, १००० रु. नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता २००० रु.आणि ५०० रु.च्या नविन नोटा नागरीकांच्या हातात पडू लागल्याने हळूहळू व्यवहार सुरळीत होऊ लागले आहे. २ हजार आणि ५०० रु.च्या नविन नोटा चलनात आल्याने नागरिकांनी
नविन नोटा व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरु पाहत आहे. चलनात असलेल्या १००० रु. ५०० रु. च्या नोटा व्यवहारातून अचानकपणे बाद करण्याचा निर्णय घेण्यात असून, नोटा मोजण्याच्या यंत्रात जुन्या नोटा मोजण्याचे सेंटींग केलेली
आहे. व्यावसायिकांना आता नव्या नोटा चलनात आल्याने याप्रमाणे नोटा मोजण्याचे यंत्रही आता अपडेट करावे लागणार आहे. नोटा मोजण्याच्या यंत्रात डिजीटल फ्रिक्वेन्सी बसविण्यात आलेली असते. यामुळे यंत्रातून नोटा मोजतांना त्या नोटा बोगस आहे किंवा नाही याची खातर जमा ही होते.

मध्यंतरीच्या काळात १००० रु. आणि ५०० रु.च्या बनावटी नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आल्याने दिवसभर व्यवसाय करुन जेव्हा व्यावसायीक आपल्याकडील रक्कम बँकेतील खात्यात भरायला जात होते. तेव्हा बॅकेतील यंत्रावर नोटा मोजतांना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावटी नोटा निघायच्या याचा फटका व्यावसायीकांना सहन करावा लागत होता. यामुळे खबरदारीच्या दृष्टीकोनातून मोठ्या व्यवसायीकांनी आपल्या दुकानात नोटा मोजण्याचे यंत्र स्वतंत्र रित्या बसवून घेतले होते. आता व्यावसायीकांसह बँकांना पतसंस्थांना हे यंत्र पुन्हा अपडेट करुन घ्यावे लागणार आहे.

https://www.dailymotion.com/video/x844igp

Web Title: VIDEO - The Red Signal of the Note Measurement Machine on New Notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.