VIDEO : बसफेरी सुरू करण्यासाठी श्रमदानातून रस्ता दुरूस्ती
By admin | Published: September 22, 2016 09:11 AM2016-09-22T09:11:12+5:302016-09-22T10:11:52+5:30
मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या गावातील नागरिकांनी रस्ता दुरूस्तीसाठी श्रमदान केले.
Next
ऑनलाइन लोकमत
भामरागड, दि. २२ - मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या राजाराम, भामनपल्ली गावातील नागरिकांनी रस्ता दुरूस्ती करून गावात बसफेरी सुरू करावी, यासाठी गुरूवारी पोलिसांच्या सहकार्याने श्रमदान केले राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला होता
गेल्या अनेक वर्षांपासून मóोराजाराम भामनपल्ली रस्ता व पुलाच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नाही, असे कारण देत सरकारने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. यावर तोडगा काढण्याबाबत सरकार गंभीर नसल्याने या भागात रस्त्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मóोराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बससेवाही बंद झाली आहे. मागील दोन वर्षांपासून खासगी प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात येऊन रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधिकार्यांना सादर केले. यावेळी ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरिक्षक परजने यांनी हे निवेदन स्वीकारले व या प्रश्नाचा भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते पोलीस अधीक्षकांनी दखल घेत मóोराजाराम भामनपल्ली परिसरातील नागरिकांची वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन नागरिकांची सभा बोलावून श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करण्याची सूचना पोलिसांना दिली.
त्यानंतर ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या अधिकार्यांनी मóोराजाराम परिसरातील येचली, भामनपल्ली, मडवेली, मरपल्ली, झिंजगाव, मडवेली, चिचोडा, टोला, इरकडुम्मे, मोकेला, रेला, बोरीया, गोरनूर, पडतमपल्ली, कसनसूर, पल्ली, जुमाबाई, लंकनगुडा, रायगुडा, बासागुडा, गेर्रा, सिपनपल्ली, दुब्बागुड्डा, पल्ली या गावात सभा घेतल्या व आता श्रमदानातून रस्ता दुरस्तीचे काम नागरिक व पोलिस यांनी सुरू केले आहे