VIDEO : सर्वसामान्यांना मनस्ताप ! एटीएम, बँकांबाहेर तोबा गर्दी

By Admin | Published: November 12, 2016 12:31 PM2016-11-12T12:31:11+5:302016-11-12T12:42:52+5:30

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 12 - चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा बदलण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मुंबईसह देशभरातील बँका आज ...

VIDEO: Sad to the masses! ATM, Toba crowd outside the banks | VIDEO : सर्वसामान्यांना मनस्ताप ! एटीएम, बँकांबाहेर तोबा गर्दी

VIDEO : सर्वसामान्यांना मनस्ताप ! एटीएम, बँकांबाहेर तोबा गर्दी

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा बदलण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मुंबईसह देशभरातील बँका आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारीदेखील ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू असणार आहेत. मंगळवारी नोटा रद्द करण्याचा निर्णय लागू झाल्यानंतर दोन दिवसांनंतर शुक्रवारी देशभरातील एटीएम सुरू करण्यात आले होते. 
 
यानंतर सर्व एटीएमबाहेर नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आहे. दुस-या दिवशीची परिस्थितीदेखील सारखीच आहे. आजदेखील एटीएम सेंटरबाहेर नागरिकांनी सकाळपासून लांबच लांब रांगा लावल्या आहेत. काही ठिकाणी उशीरा एटीएम उघडत असल्याने, तर काही एटीएममध्ये पैसेच नसल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. 
 
(धक्कादायक ! सुट्टे पैसे नसल्यामुळे नवजात मुलाचा मृत्यू)
 
अकोल्यातील एटीएम सेंटर अजूनही बंद
 
 
सर्वसामान्यांना काहीसा दिलासा
दुसरीकडे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी केंद्र सरकारने 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यानं नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पेट्रोल पंप, रेल्वे, विमान, मेट्रो तिकीट, रुग्णालये, वीज बिल भरणा केंद्र, शासकीय कर भरण्यासाठी आता जुन्या नोटा वापरता येणार आहेत. 
 

https://www.dailymotion.com/video/x844hn1

Web Title: VIDEO: Sad to the masses! ATM, Toba crowd outside the banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.