VIDEO - 40 एकर शेत विकणे आहे, किंमत एक विषाची बाटली

By Admin | Published: July 5, 2017 01:04 PM2017-07-05T13:04:28+5:302017-07-05T13:26:55+5:30

 ऑनलाइन लोकमत  आकोट, दि. 5 - 40 एकर शेत विकणे आहे. किमंत एक विषाची बाटली असा संदेश लिहीलेला फलक ...

VIDEO - The sale of 40 acres of farm, price one poison | VIDEO - 40 एकर शेत विकणे आहे, किंमत एक विषाची बाटली

VIDEO - 40 एकर शेत विकणे आहे, किंमत एक विषाची बाटली

Next

 ऑनलाइन लोकमत 

आकोट, दि. 5 - 40 एकर शेत विकणे आहे. किमंत एक विषाची बाटली असा संदेश लिहीलेला फलक हाती घेऊन एक शेतकरी पत्नी व चिमुकल्या मुलासह आकोट शहरातील शिवाजी चौकात उभा होता. हे दृश्य पाहून अनेकाची मने हेलावली. कर्जमाफीनंतरही शेतकरी हताश असल्याचे या घटनेतून दिसून आले. 
 
शशिकांत गयधर असे या शेतक-याचे नाव असून, भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मतदार संघात ते रहातात. आकोट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर  शशिकांत गयधर हे शेती विक्रीचा फलक हाती घेऊन बसले होते. त्याच्यासोबत त्यांचे कुटुंबही होते. हातातील फलकावर 40 एकर वावर विकणे आहे, किंमत एक विषाची बाटली व स्वतःचा मोबाईल नंबर लिहीला होता. 
गयधर हे शेतातील मालाला योग्य भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी झाले आहेत. शेतीवर कर्ज आहे. कर्जमाफीची घोषणा झाली.
 
आणखी वाचा 
 
पंरतु लाभ अद्याप भेटला नाही. बँक कर्ज देत नाही. पेरणीचे दिवस असून कोणताही दुकानदार कृषिसाहीत्य देत नाही. अशा स्थितीत मनविषन्न झालेल्या गयधर यांनी विषाच्या एका बाटलीच्या मोबदल्यात चक्क शेती विकायला काढली. या घटनेची माहीती मिळताच आकोट शहर पोलीस शिवाजी चौकात पोहचले. त्यांनी गयधर यांची समजूत काढली पोलीस स्टेशनला गाडीत बसवून घेऊन गेले. 
https://www.dailymotion.com/video/x84572o

Web Title: VIDEO - The sale of 40 acres of farm, price one poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.