Video: साध्वी प्रज्ञा या देशद्रोहीची जीभ छाटली पाहिजे - संभाजी ब्रिगेड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:38 PM2019-04-19T16:38:23+5:302019-04-19T16:54:18+5:30
शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे.
पुणे - भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे. सर्व स्तरातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. हेमंत करकरे यांनी हिंदुत्ववादी व हिंदुत्वाच्या नावावर विकृत विचारसरणी पेरणाऱ्या भगव्या दहशतवाद्यांचा खरा चेहरा 'टरा-टरा' फाडून टाकला. परंतु 'शहिद हेमंत करकरे यांना मारल्यामुळे प्रज्ञा सिंह साध्वीचं सुतक संपलं...?' याचा अर्थ करकरे यांना मारणारे मास्टर माईंड व साध्वीचे बोलवते धनी आरएसएस रुपी कोण आहेत. हे भारतासमोर आज आलेला आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे.
हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीनं अडकवलं, त्यांना सांगितलं होतं की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला, असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. यावर संतोष शिंदे म्हणाले की, देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी हेमंत करकरे, विजय कामठे, विजय साळसकर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्या दहशतवाद्यांनी त्यांना मारलं त्या दहशतवादाचा खोटा चेहरा भारतातील लोकशाही व न्यायव्यवस्थेनी ठेचला. हू किल्ड करकरे...'! याचा अर्थ शहीद करकरे, कामठे व साळसकर यांना मारणारे खरे आरोपी कोण आहेत भारतासमोर आलं पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह साध्वी आहे. अन्य ठिकाणच्या बॉम्बस्फोटाचे व दहशतवादी हल्ल्याच्या गटांमध्ये सुद्धा साध्वीचा हात आहे. ही देशद्रोही व्यक्ती भाजपकडून भोपाळमध्ये उमेदवारी 'भाजप' देते व ती घेते हे या देशाचे दुर्दैव आहे. भाजपचा खोटा देशभक्तीचा भुरका आज प्रज्ञा सिंह साध्वीने टरा-टरा फाडून टाकलेला आहे. अशा देशद्रोही व्यक्तीचे भाजप नेते व पंतप्रधान उमेदवारी देऊन समर्थन करतात हे या देशांमध्ये हिटलरशाही प्रस्थापित करण्याचे उत्तम उदाहरण आहे असा आरोपही संभाजी ब्रिगेडने केला.
तसेच हा मनुवादी प्रकार आहे. त्याच्यामुळे भारतीय लोकशाहीवर व भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रचंड वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रज्ञा सिंह साध्वीच्या या वादग्रस्त वक्तव्याचा संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व महाराष्ट्राच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं.