VIDEO- शाळेत फुलविला भाजीपाल्याचा मळा

By Admin | Published: February 8, 2017 06:08 PM2017-02-08T18:08:39+5:302017-02-08T18:08:39+5:30

ऑनलाइन लोकमत/बबन देशमुख  वाशिम, दि. 8 - तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गव्हा येथे शिक्षकांनी फुलविलेल्या भाजीपाल्याच्या मळ्याचे संगोपन आणि ...

VIDEO - Schoolyard Flourished Vegetable School | VIDEO- शाळेत फुलविला भाजीपाल्याचा मळा

VIDEO- शाळेत फुलविला भाजीपाल्याचा मळा

Next

ऑनलाइन लोकमत/बबन देशमुख 
वाशिम, दि. 8 - तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गव्हा येथे शिक्षकांनी फुलविलेल्या भाजीपाल्याच्या मळ्याचे संगोपन आणि देखरेख करण्यास सांगून ज्ञानदानासोबतचं कृषीचेही ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम शाळेने सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील गव्हा शाळेत जवळपास विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे आणि मिळणारा पोषण आहारही याच मळ्यातील भाजीपाल्यातून मिळावा यासाठी शिक्षकांनी हा प्रयोग केला आहे. यासह विविध प्रयोगामुळे जिल्ह्यातील ही पहिली आयएसओ नामांकीत शाळा आहे.

२०१६ या वर्षांपासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील परसबागेत पालेभाज्यांचा मळा फुलविला आहे. वाफे तयार करून पालक, मेथी, कोथिंबीर, मुळा, शेपू इत्यादी भाजा लावल्या आहेत. भाज्यांवर झालेली कीड, पाणी देणे, भाजी काढणे व यासह इतर बाबीचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत.

https://www.dailymotion.com/video/x844qqx

Web Title: VIDEO - Schoolyard Flourished Vegetable School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.