VIDEO: पाणी प्रश्नावरुन एसडीओ, बीडीओंना गावक-यांचा घेराव

By Admin | Published: May 23, 2017 12:41 PM2017-05-23T12:41:43+5:302017-05-23T12:42:04+5:30

ऑनलाइन लोकमत जानेफळ (बुलडाणा), दि. 23 - मेहकर तालु्क्यातील पार्डी येथे पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता गेलेल्या अधिका-यांना गावक-यांनी मंगळवारी सकाळी ...

VIDEO: SDO on water issue, surrounded by villagers, villagers | VIDEO: पाणी प्रश्नावरुन एसडीओ, बीडीओंना गावक-यांचा घेराव

VIDEO: पाणी प्रश्नावरुन एसडीओ, बीडीओंना गावक-यांचा घेराव

Next
ऑनलाइन लोकमत
जानेफळ (बुलडाणा), दि. 23 - मेहकर तालु्क्यातील पार्डी येथे पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता गेलेल्या अधिका-यांना गावक-यांनी मंगळवारी सकाळी घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 
 
१९ मे रोजी गावातील सावित्री सहदेव घुगे ही महिला पाणी भरण्यासाठी गेली असता विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, गटविकास अधिकारी पवार, उपअभियंता खिल्लारे गावामध्ये गेले. अधिकारी गावामध्ये ग्रामस्थांनी अधिकाºयांना घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय अधिकाºयांनी पोलिसांना बोलाविले असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

https://www.dailymotion.com/video/x844zdg

Web Title: VIDEO: SDO on water issue, surrounded by villagers, villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.