VIDEO : बागडण्याच्या वयात ते विकतात दुस-यांना आनंद

By admin | Published: October 23, 2016 07:17 PM2016-10-23T19:17:33+5:302016-10-23T19:17:33+5:30

स्वत:चे वय खेळण्या-बागडण्याचे असताना मातापित्यांसह हजारो मैलांची भटकंती करीत आपल्याच वयाच्या चिमुकल्यांना खेळणी विकण्याचे काम

VIDEO: Selling them at the time of the shoot, the other fun | VIDEO : बागडण्याच्या वयात ते विकतात दुस-यांना आनंद

VIDEO : बागडण्याच्या वयात ते विकतात दुस-यांना आनंद

Next
>ऑनलाइन लोकमत
 
वाशिम,दि. 23 - स्वत:चे वय खेळण्या-बागडण्याचे असताना मातापित्यांसह हजारो मैलांची भटकंती करीत आपल्याच वयाच्या चिमुकल्यांना खेळणी विकण्याचे काम राजस्थानमधील चिमुकल्यांना करावे लागत आहे. हे विदारक चित्र वाशिम येथे बालाजी यात्रोत्सवात पाहायला मिळत आहे. 
 
कोणत्याही पित्याला आपली मुले हसता, बागडताना पाहणे आवडत नाही, असे उदाहरण शोधूनही सापडणार नाही; परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी काही मातापित्यांना नाईलाजास्तव आपल्या चिमुकल्यांना घेऊन हजारो मैल भटकंती करावी लागते . असे उदाहरण वाशिम शहरात काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सद्यस्थितीत बालाजी यात्रोत्सव सुरू आहे. या यात्रोत्सवात प्लास्टिकच्या पेपरपासून बनविलेली खेळणी विकण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथून काही कुटुंब आली आहेत. त्यामध्ये केरीराम बावरिया यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. हे कुटूंब आपल्या तीन चिमुकल्या मुलीसह शहरात येथे तेथे फिरुन प्लास्टिकची खेळणी विकत आपल्या उदरनिवार्हाची सोय लावत आहेत. यामध्ये त्यांना त्यांची ८ वर्षीय चिमुकलीही मदत करीत आहे. आई-वडिल विश्रांती घेत असले, की ही चिमुकली खेळणी घेऊन त्यांच्या आसपास फिरत आपल्याच वयाची ग्राहके शोधते. प्रत्यक्षात या चिमुकलीलाच सध्या खेळण्याची आवश्यकता आहे; परंतु मातापित्यांच्या गरीबीमुळे तिचे बालपणच हिरवल्या गेले आहे. 

Web Title: VIDEO: Selling them at the time of the shoot, the other fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.