VIDEO - आगळी वेगळी दिवाळी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत...

By admin | Published: October 27, 2016 03:52 PM2016-10-27T15:52:43+5:302016-10-27T15:52:43+5:30

दरवर्षीप्रमाणे सोशल नेटवर्कींग फोरमच्यावतीने २७ ऑक्टोबरला सकाळी गढईपाडा या पेठ जवळच्या गावात दिवाळी साजरी करण्यात आली

VIDEO - Separate Diwali with tribal students ... | VIDEO - आगळी वेगळी दिवाळी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत...

VIDEO - आगळी वेगळी दिवाळी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत...

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - दरवर्षीप्रमाणे सोशल नेटवर्कींग फोरमच्यावतीने २७ ऑक्टोबरला सकाळी गढईपाडा या पेठ जवळच्या गावात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी नविन खेळणी, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि फराळाचे पदार्थ मुलांना भेट देण्यात आले.
गेली सहा वर्षे दिवाळीचा पहिला दिवा आदिवासी बांधवांच्या दारी लावल्यानंतर फोरमचे सदस्य आपल्या कुटूंबीयांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.

फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी फेसबुकवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीसाठी भेटवस्तू देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कराड (जि. सातारा) येथून सचिन पाटील यांनी अ‍ॅमेझॉनवरून काही खेळणी पाठवली. नाशिकचे डॉ. समिर पवार, डॉ. विशाल पवार, डॉ. सारिका देवरे यांनी वह्या, पुस्तकं, ड्रॉइंगबुक्स, कलरबॉक्स, स्केचपेन्स हे शैक्षणिक साहित्य भेट दिलं. दिनेश जोशी, प्रा. डॉ. आशिष चैरसिया, बाबाराव बिहाडे यांनी फराळाचे पदार्थही आणि मिठाई आणून दिली. याशिवाय अनेक फेसबुक मित्रांनी कपडे आणि खेळणी पाठवली.

हे सर्व साहित्य फोरमचे सदस्यांनी गढाईपाडा या गावातील विद्यार्थ्यांना भेट दिले. ही आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, बाबाराव बिहाडे, डॉ. उत्तमराव फरतळे, डॉ. बापू खालकर हे उपस्थित होते.

Web Title: VIDEO - Separate Diwali with tribal students ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.