ViDEO : पापड लाटून तिने मिळविले दहावीत यश

By Admin | Published: June 13, 2017 05:54 PM2017-06-13T17:54:32+5:302017-06-13T17:54:32+5:30

नीलिमा शिंगणे-जगड/ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 13 - एखाद्याला श्रमाचे महत्व सांगताना‘कितने पापड बेलने पडे किंवा पापड बेलने पडने पर ...

ViDEO: She won her double success | ViDEO : पापड लाटून तिने मिळविले दहावीत यश

ViDEO : पापड लाटून तिने मिळविले दहावीत यश

googlenewsNext
नीलिमा शिंगणे-जगड/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 13 - एखाद्याला श्रमाचे महत्व सांगताना‘कितने पापड बेलने पडे किंवा पापड बेलने पडने पर मालूम होंगा’,असे सहज सांगून जातो. परंतू हे वास्तव खरचं अकोल्यातील वैष्णवी कोटरवार हिने जगलं. पापड लाटून तिने इयत्ता दहावीत यश प्राप्त केले. सुख शोधण्यासाठी वैष्णवी जगतेय. आणि हे मिळविण्यासाठी ती कठोर मेहनत करीत आहे. .
वैष्णवी स्व. सुगनचंद सुखदेव तापडिया विद्यालयाची विद्यार्थींनी. बाळापूर रोडवरील मारू ती नगरात राहते. दहा बाय दहाची टिनाची खोली. खोलीत आई-वडिल, छोटे बहीण-भाउ आणि वैष्णवी एवढे राहतात. वडिल रविंद्र अ‍ॅटोरिक्षा चालवितात. आई किरण,छोटी बहिण अंजली आणि वैष्णवी दिवसभरात पाचशे पापड लाटून उदरनिर्वाह करतात. लहान भाउ कुस्तीपटू अंगद तिसºया वर्गात शिकतो.  वैष्णवीला खेळ आणि कलेत आवड आहे. परंतू अभ्यास आणि पापड लाटणे यातून सवड मिळत नसल्याने तिला छंदाला मुरड घालावी लागते.
वैष्णवी ९०-९५ टक्केवारीच्या रांगेत नसली तरी तिचे यश गुणवत्तेच्या श्रेणीत समाविष्ट व्हावी,असेच आहे. सकाळी सुर्यादयापूर्वी उठून दोन तास आणि रात्री झोपण्याआधी दोन तास अभ्यास करायची. मधल्या वेळेत शाळा आणि शाळेतून घरी आल्यावर पापड लाटायला बसणे, अशी वैष्णवीची दैनंदिनी असायची. वैष्णवीला वाचन करणे आवडते. यामुळेच तिला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही शिकवणी वर्गाची गरज भासली नाही. स्वबळावर वैष्णवीने ५८ टक्के गुण मिळविले. 
अलीकडच्या काळात सर्वच मुला-मुलींना अभियंता किंवा डॉक्टर व्हायचं असते. किंवा कोणी आयएएस होण्याचं स्वप्न बघतं. परंतू वैष्णवी या सर्वांपेक्षा वेगळी आहे. तिला फोटो जर्नालिस्ट व्हायचं असल्याचं ‘लोकमत’ जवळ सांगितलं. स्वाभिमानानं जगणारं कोटरवार कुटूंब. आणि हेच संस्कार वैष्णवीवर पडले. वैष्णवी प्रतिकुल परिस्थितीतून आपल्या कुटूंबाला काढण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता शिक्षण हेच महत्वाचं आहे, हे वैष्णवीला माहित आहे. यासाठीच ती कसून अभ्यास क रू न उच्चशिक्षण घेणार असल्याचेही म्हणाली.
वैष्णवी ज्या आत्मविश्वासाने संवाद साधते आणि तिची परिस्थिती पाहल्यावर सहज कविता आठवते.
‘‘ दु:खाचा डोंगर असेल तर
    सुखाचा सागर पण असतो
    छोटयाशा डोंगरा आड
    एक विशाल सागर असतो
    डोंगर चढतांना कधी हरायचं नसतं
    सुख शोधण्यासाठीच तर 
    पुढे जगायचं असतं’’        
 
https://www.dailymotion.com/video/x8453lq

Web Title: ViDEO: She won her double success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.