Video: भारनियमन काळात शिरपूरचे पोलीस करतात ‘मोबाइल टॉर्च’वर काम! चार वर्षांपासून जनरेटर बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 03:20 PM2017-10-04T15:20:02+5:302017-10-04T15:22:01+5:30
मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये जनरेटर चार वर्षांपासून बंद असल्याने व सद्यस्थितीत दिवसात 7 तास भारनियमन असल्याने रात्रीच्या भारनियमानावेळी पोलीस कर्मचा-यांना ‘मोबाइल टॉर्च’वर काम करण्याची वेळ
Next
शिरपुर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये जनरेटर चार वर्षांपासून बंद असल्याने व सद्यस्थितीत दिवसात 7 तास भारनियमन असल्याने रात्रीच्या भारनियमानावेळी पोलीस कर्मचा-यांना ‘मोबाइल टॉर्च’वर काम करण्याची वेळ आली आहे.
शिरपूर परिसरात सकाळी 5.30 ते 9 व संध्याकाळी 5 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत भारनियमन दररोज करण्यात येते. यापूर्वी हे भारनियमन नव्हते, गत एक महिन्यापासून सतत हे भारनियमन होत असल्याने पोलिसांना कामे करताना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
पाहा व्हिडीओ -