VIDEO - शिवसेना खासदाराने विमान कर्मचाऱ्याला बदडले

By admin | Published: March 24, 2017 02:37 AM2017-03-24T02:37:03+5:302017-03-24T07:35:11+5:30

शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या ड्युटी मॅनेजरला चपलेने मारल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी दिल्लीत

VIDEO - Shiv Sena MP disrupted airline staff | VIDEO - शिवसेना खासदाराने विमान कर्मचाऱ्याला बदडले

VIDEO - शिवसेना खासदाराने विमान कर्मचाऱ्याला बदडले

Next

नवी दिल्ली : शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या ड्युटी मॅनेजरला चपलेने मारल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी दिल्लीत घडला. आपण त्याला सँडलने २५ वेळा मारले, असे स्वत: गायकवाड यांनी सांगितले.
खा. गायकवाड यांच्याविरुद्ध मारहाण केल्याचा आणि एअर इंडियाचे विमान तब्बल ४0 मिनिटे रोखून धरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी या प्रकाराबद्दल खा. गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. खा. रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या कार्यालयाला देण्यात आली होती. विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली.
विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास 
तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत सँडलने मारले. 
यासंदर्भात खा. गायकवाड म्हणाले की, मी तक्रार पुस्तिका मागितली, तेव्हा अरेरावी करीत संबंधित कर्मचारी माझ्या अंगावर धावून आला. आपण खासदार असल्याचे सांगितल्यावरही तो माझ्याशी उद्धटपणे बोलत राहिला. त्यामुळे त्याची कॉलर धरून मी त्याला मारले. मारहाणीत सुकुमार यांचा चश्माही तुटला. आपण भाजपचे नव्हे, शिवसेनेचे खासदार आहोत, असा अपमान मी सहन करणारच नाही, असेही खा. गायकवाड म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
शिवसेनेने मागितला खुलासा
खा. गायकवाड यांच्याकडून खुलासा मागविला आहे. शिवसेनेला कोणत्याही प्रकारचा हिंसाचार मान्य नाही. एअर इंडियात शिवसेनेची कर्मचारी संघटना आहे. मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे म्हणणेही आम्ही युनियनमार्फत जाणून घेत आहोत.- हर्षल प्रधान, शिवसेना पक्षप्रमुखांचे प्रसिद्धी सल्लागार
हे वर्तन अमान्यच
पक्षातील कोणीही अशा प्रकारचे वर्तन करणे शिवसेनेला मान्य नाही. खासदार गायकवाड यांचा स्वभाव तापट नाही. त्यामुळे असे करणे त्यांना का भाग पडले हेही पाहायला हवे.- मनीषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेना
संसदेत विषय उपस्थित करणार
हा फक्त शिवसेनेचा प्रश्न नाही. खासदार त्यांच्या हक्कांबद्दल एकजुटीने बोलतात, मग अशा वेळीही त्यांनी एकमुखाने बोलायला हवे. शिवाय सरकार कोणती भूमिका घेणार हे विमान वाहतूकमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे. भाजपाच्याही अनेक खासदारांनी यापूर्वी असे वर्तन केले आहे. आम्ही हा विषय संसदेत उपस्थित करू.- प्रियंका चतुवर्दी, प्रवक्त्या, काँग्रेस
जबाबदारीने वागावे
खसदार म्हणून आम्ही सर्वांनीच अधिक जबाबदारीने वागायला हवे. माझ्या सहकारी खासदाराने काही चुकीचे वर्तन केले असेल तर त्याच्या वतीने इथे दिल्लीत बसलेल्या सर्वच खासदारांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी.
- किरिट सोमय्या, खासदार, भाजपा

Web Title: VIDEO - Shiv Sena MP disrupted airline staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.