VIDEO - वीज चोरीचे रिमोट विकणा-यासह खरेदीदारांचा भंडाफोड
By Admin | Published: July 15, 2017 06:20 PM2017-07-15T18:20:41+5:302017-07-15T18:22:19+5:30
ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 15 - चीनमधून आयात रिमोट आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या आधारे वीज चोरी कशी करावी हे शिकविणा-या ...
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 15 - चीनमधून आयात रिमोट आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या आधारे वीज चोरी कशी करावी हे शिकविणा-या इलेक्ट्रीशियन तरूणाला पोलिसांनी अटक केली. वीजचोर ग्राहकांविरूद्ध गुन्हा नोंदविला,अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव आणि महावितरणचे सहव्यवस्थापकिय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस आयुक्त म्हणाले की, वीज चोरीसाठी लोक वेगवेगळे फंडे वापरतात. पोलिसांच्या मदतीने महावितरणच्या अधिकाºयांनी संशयित वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी सुरू केली. या मोहिमेत काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करताना आढळले. काही ग्राहकांनी चक्क चायना मेड रिमोट कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा वापर करून वीज चोरी सुरू केल्याचे समोर आले. मयुरपार्क येथील एका बंगल्यात महावितरणचे अधिकारी तपासणीसाठी गेले तेव्हा त्यांना तेथील मीटर बंद दिसले. त्यांना संशय आला.
रिडींग घेण्यासाठी मीटर सुरू असणे आवश्यक असल्याचे अधिकाºयांनी घरातील महिलेस सांगितले. तेव्हा त्यांनी रिमोट कं ट्रोल अधिकाºयांच्या हवाली केले आणि रिमोटचे बटन दाबून मीटर सुरू केले. त्या ग्राहकांसह परिसरातील अनेकांनी अशा रिमोटचा वापर करून वीज चोरी करीत असल्याचे आढळले. वीज ग्राहकांना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी किशोर रमेश राईकवार (रा. हर्सूल , मूळ रा. अमरावती) याने हे रिमोट कंट्रोल आणून दिल्याचे सांगितले. यांनतर पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतले.
यु ट्युबवरून तयार केल्या वीज चोरीच्या मॅग्नेटिक बॅट्स
पोलीस आयुक्त म्हणाले की, आरोपी हा दहावी पास आहे. तो इलेक्ट्रेशियन आहे. त्याने मीटरमध्ये फेरफार न करता वीज चोरी करावी, याची व्हिडिओ क्लीप इंटरनेटवरील यु ट्युबवर पाहिली. या ट्युबमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याने मच्छर मारण्याच्या बॅटचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीमुळे मीटर हँग होते. मीटर बंद होऊन वीज पुरवठा सुरू असल्याचे प्रात्यक्षिक ग्राहकांना दाखविले. त्यानंतर त्याने शेकडो ग्राहकांना अशा इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स बॅटची विक्री केली.
https://www.dailymotion.com/video/x84580t