व्हिडिओ : लोकसभेत प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 10:16 AM2019-06-29T10:16:50+5:302019-06-29T10:27:37+5:30
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी अशा मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. त्यावर स्मृती इराणी म्हटल्या की, मला देखील मराठी येते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मला ठावूक असून शेतकऱ्यांना निश्चितच मदत करण्यात येईल.
नवी दिल्ली - मराठावाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केला. मराठवाडा आणि विशेष: बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी अशी मागणी मुंडे यांनी लोकसभेत केली. त्याला उत्तर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी दिले. परंतु, त्यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरले आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी अशा मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. त्यावर स्मृती इराणी म्हटल्या की, मला देखील मराठी येते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मला ठावूक असून शेतकऱ्यांना निश्चितच मदत करण्यात येईल.
बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त कापुस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडुन विशेष मदत मिळावी अशी मागणी आज संसदेत तारांकित प्रश्न विचारत केली. pic.twitter.com/lmbGnhkvIZ
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) June 28, 2019
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहेत. परंतु, अनेकदा कमी पावसामुळे तर कधी कमी दर मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी मुंडे यांनी केली. त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या की, मला देखील मराठी येते. परंतु, मुंडे यांनी इंग्रजीत बोलण्याचा निर्णय घेतला ती चांगली गोष्ट आहे. असो. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मदत कराण्यास वस्त्रोद्योग खाते तयार आहे. त्यासाठी प्रितम मुंडे यांनी वस्त्रोद्योग मंत्रालायाच्या संपर्कात राहावे, असंही स्मृती इराणी म्हणाल्या. महिला व बालकल्याणसह वस्त्रोद्योग मंत्रालय देखील स्मृती इराणी यांच्याकडे आहे.