VIDEO - असा पकडतात साप! सर्पमित्रांनी दाखविले प्रात्यक्षिक
By Admin | Published: February 13, 2017 08:14 PM2017-02-13T20:14:03+5:302017-02-13T20:30:03+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 13 - साप निघाल्यानंतर तो कसा पकडल्या जातो याचे प्रात्यक्षिक काही सर्पमित्रांनी सोमवारी करून दाखविले. ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 13 - साप निघाल्यानंतर तो कसा पकडल्या जातो याचे प्रात्यक्षिक काही सर्पमित्रांनी सोमवारी करून दाखविले. एका वसाहतीमध्ये सर्वसामान्य नागरिकाने पकडून आणलेला साप वनविभागाच्या सुपूर्द करण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रात्यक्षिक करून दाखविले.
वाशिम शहरातील रिसोड रस्त्यावरील लीला पाठशालेच्या मागील दत्तनगर वसाहतीमध्ये सोमवारी १ वाजताच्या दरम्यान नाग निघाला. याला पकडण्यासाठी साप पकडण्याचा अनुभव नसलेल्या पण त्याला जीवनदान मिळावे या उद्देशाने ए.के. चौधरी यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्या सापाला पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र आल्यानंतर सदर साप कसा पकडला याबाबत चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितल्यानंतर साप कसा पकडावा यासाठी पकडून आणलेल्या सापाला मोकळे सोडून पकडण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यासाठी सर्पमित्र दिवाकर रामभाऊ कौडिण्य, आकाश बळीराम रत्ने, गोकूळ ताजणे, संदीप गावंडे, बोकी कांबळे व सर्वेक्ष उंबरकर यांनी प्रयत्न केले. त्यानंतर वनविभागातील कर्मचारी हिराकांत अंभोरे, रंगराव जाधव व लक्ष्मण चव्हाण आल्यानंतर सदर नाग त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याची नोंद करून सदर नागास वनविभागात सोडून दिले.
https://www.dailymotion.com/video/x844r1f