व्हिडीओ : सोलापूरात रात्री दोन पर्यंत विसर्जनाची धामधूम सुरुच
By admin | Published: September 16, 2016 04:12 AM2016-09-16T04:12:30+5:302016-09-16T04:12:30+5:30
सोलापूर शहराच्या मधोमध असलेले सिध्देश्वर तलाव आणि विजापूर रस्त्यालगत असलेल्या संभाजी तलावावर आज रात्री दोन पर्यंत विसर्जनाची लगबग सुरुच होती.
दीपक होमकर : सोलापूर
सोलापूर शहराच्या मधोमध असलेले सिध्देश्वर तलाव आणि विजापूर रस्त्यालगत असलेल्या संभाजी तलावावर आज रात्री दोन पर्यंत विसर्जनाची लगबग सुरुच होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास मोठ्या पावसाला सुरवात झाली आणि रेंगाळलेल्या मिरवणुकानी गती वाढवत थेट तळ गाठल. सिध्देश्वर मंदिराच्या भोवताली असलेल्या तलावात आज गणपती घाट आणि होम मैदान जवळील गेटवर विसर्जनासाठी केलेल्या कुंडात गणेश विसर्जनासाठी गर्दी होती दोन्ही कुंड कायम स्वरुपी विसर्जनासाठी बांधले असल्याने कुंडात पाच फुटापेक्षा मोठे गणपती पूर्ण बुडत नव्हते त्यामुळे पोहत कुंडाच्या पुढे जावून मुर्ती विसर्जन करण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करत होते.
संभाजी तलावावर लष्कर आणि विजापूर रस्त्यावरील मंडळ आणि रहिवास्यानी गणेशाचे विसर्जन केले. सिध्देश्वरच्या तुलनेने येथील मिरवणुका लवकर आटोपल्या. तलावात चार ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. तलाव काठापासूनच चार फूट खोल व पुढे आणखी खोल होत गेल्याने येथे पाच ते सात फुटाचे गणपती सहज विसर्जित होत होते. दहा फुटांवर बॅरेल व्दारे धोक्याची पातळी आखली होती.
गणेशाचे विसर्जन रात्री दोन पर्यंत होत असले तरी दर्शक भाविकांची गर्दी मात्र बारा नंतर ओसरली. शिवाय बारा नंतर वाद्यास बंदी घातल्याने विनावाद्य केवळ मोरयाच्या जयघोष करत मिरवणूक रस्त्यावरुन तलावाच्या दिशेने मार्गस्थ होत होत्या...