VIDEO- बाजार समित्यांमध्ये सोयाबिनची आवक वाढली!
By Admin | Published: November 7, 2016 07:22 PM2016-11-07T19:22:18+5:302016-11-07T19:22:18+5:30
सुनील काकडे /ऑनलाइन लोकमत वाशीम, दि. 7 - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सोयाबिनची विक्री पूर्णत: ठप्प झाली होती. दरम्यान, २ नोव्हेंबरपासून ...
सुनील काकडे /ऑनलाइन लोकमत
वाशीम, दि. 7 - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सोयाबिनची विक्री पूर्णत: ठप्प झाली होती. दरम्यान, २ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या पूर्ववत सुरू झाल्यानंतर दैनंदिन सोयाबिनची आवक वाढली आहे. मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
वाशीम जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिनचा सर्वाधिक पेरा असतो. नगदी आणि हमखास अशी ओळख असलेल्या या शेतमालाला मात्र गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाले आहे. यंदा शासनाने सोयाबिनला २७७५ रुपये हमीदर लागू केला;
तर व्यापाऱ्यांकडून सद्या २८०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर दिला जात आहे. तो निश्चितपणे कमी असला तरी घरात, गोदामात पडून राहिल्यापेक्षा सोयाबिन विकून पैसे ढिले करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844h6l