VIDEO : तारे जमी पर... चिमुकल्यांनी घडविले ऋषभराज
By admin | Published: August 31, 2016 05:43 PM2016-08-31T17:43:48+5:302016-08-31T17:43:48+5:30
अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त तसेच पोळा सणाच्या पृष्ठभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी शिव हेल्थ क्लबचे शिवा मोहोड यांच्या संकल्पनेतून मातीपासून बैल बनविण्याची
Next
- सचिन राऊत/ प्रविण ठाकरे
अकोला, दि. 31- अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त तसेच पोळा सणाच्या पृष्ठभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी शिव हेल्थ क्लबचे शिवा मोहोड यांच्या संकल्पनेतून मातीपासून बैल बनविण्याची भव्य स्पर्धा बुधवारी घेण्यात आली. रिमझीम पावसात शेकडो मुलांनी तुकाराम चौकामध्ये मातीपासुन बैल बनविण्यासाठी गर्दी केली होती. तंत्रज्ञानाकडे वळलेल्या मुलांना आपल्या संस्कृती व परंपरेची माहिती व्हावी, या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
भारत देश कृषिप्रधान असून, शेतात बळीराजासोबतच रात्रं-दिवस राबणा-या बैलांविषयी माहिती शहरी मुलांना व्हावी, त्यांना शेतीविषयक कामांची माहिती व्हावी, बैलांविषयीच नव्हे तर गोवंशाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने शिव हेल्थ क्बलच्यावतीने शालेय मुलांसाठी मातीपासून बैल बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शालेय विद्यार्थी स्पर्धकांना मोफत प्रवेश देण्यात आला असून शेकडो विद्यार्थी मातीपासुन बैल बनविण्यात रमले होते. वर्ग १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम बक्षीस तीन हजार रुपये, द्वितीय बक्षीस दोन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस एक हजार रुपये रोख देण्यात आले. यासोबतच वर्ग ६ वी ते १० वीच्या वयोगटासाठी प्रथम बक्षीस एक हजार रुपये, द्वितीय बक्षीस ७०० रुपये, तृतीय बक्षीस ५०० रुपये देण्यात आले. यासोबतच खुल्या गटासाठी प्रथम बक्षीस एक हजार, द्वितीय बक्षीस ७०० रुपये आणि तृतीय बक्षीस ५०० रुपये देण्यात आले. मातीचे बैल बनविण्यासाठी स्पर्धकांनी प्रचंड गर्दी केली होती. शिव हेल्थ क्लबचे शिवा मोहोड यांनी राबविलेल्या या अनोख्या स्पर्धेत लहाण मुले ‘तारे जमीं पर’ चित्रपटातील एका दृष्याप्रमाणेच बैल तयार झाल्यानंतर त्यांना रंगवितांना दिसली.