VIDEO- साखर कारखान्यांचा हंगाम सुरू
By Admin | Published: November 6, 2016 01:23 PM2016-11-06T13:23:56+5:302016-11-06T13:23:56+5:30
ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 6 - कोल्हापूर विभागातील सहा साखर कारखान्यांचा शनिवारपासून हंगाम सुरू झाला. उर्वरित बहुतांश कारखान्यांचा येत्या ...
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 6 - कोल्हापूर विभागातील सहा साखर कारखान्यांचा शनिवारपासून हंगाम सुरू झाला. उर्वरित बहुतांश कारखान्यांचा येत्या दोन दिवसांत हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. ऊसदराची कोंडी फुटल्याने कारखान्यांचा गळीत हंगाम कधी सुरू होणार याकडे शेतकर्यांच्या नजरा लागल्या आहेत. साखर कारखान्यांनीही तयारी केली असली तरी ऊसतोडणी मजूर न आल्याने हंगाम सुरू होऊ शकला नाही.
मंत्री समितीने डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कारखानदारांनी मागणी केल्यानंतर ५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास मंत्री समितीने परवानगी दिली. त्याचबरोबर 'स्वाभिमानी'ची ऊस परिषद होऊन त्यातून प्रतिटन ३२00 रुपयांची मागणी झाली. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करीत कोल्हापूर जिलतील ऊसदराची कोंडी फोडली. यंदा गत हंगामाप्रमाणे आंदोलनाशिवाय हंगाम सुरू होत आहेत. सरकारने शनिवारपासून हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली होती; पण गेले पंधरा दिवस वारणा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे.
https://www.dailymotion.com/video/x844h2e