VIDEO - लातूरमध्ये कार्यकर्त्यांनी जाळला खासदारांचा पुतळा

By Admin | Published: April 29, 2017 05:38 PM2017-04-29T17:38:23+5:302017-04-29T17:38:23+5:30

ऑनलाइन लोकमत  लातूर, दि. 29 -  लातूर-मुंबई एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी गांधी ...

VIDEO - Statue of MPs burned by activists in Latur | VIDEO - लातूरमध्ये कार्यकर्त्यांनी जाळला खासदारांचा पुतळा

VIDEO - लातूरमध्ये कार्यकर्त्यांनी जाळला खासदारांचा पुतळा

Next
ऑनलाइन लोकमत 
लातूर, दि. 29 -  लातूर-मुंबई एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी गांधी चौकात लातूर-रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुनिल गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला.
 
मुंबई-लातूर एक्सप्रेस गेल्या दहा वर्षांपासून लातूरकरांच्या सेवेत आहे. या रेल्वेला लातूरहून दररोज अडीच ते तीन हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवासी क्षमतेपेक्षा दीड पट प्रवासी या रेल्वेने दररोज जातात. ही रेल्वे आता विस्तारीकरणाच्या नावाखाली थेट बीदरपर्यंत नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचा वाद आता चिघळला असून, याविरोधात लातूर शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी हा निर्णय हाणून पाडण्यासाठी आंदोलन उभारले आहे. 
 
शनिवारी या आंदोलनाचा भाग म्हणून लातूर रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले़ यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व रेल्वे समितीच्या सदस्यांनी भाषणे केली़ मुंबई-लातूर रेल्वे ही लातूरकरांची ओळख आहे़ गेल्या दहा वर्षांपासून लातूर ते मुंबई या मार्गावर दीड पटीने प्रवासी घेवून धावणारी रेल्वे आता बीदरपर्यंत सोडण्यात आली आहे़
त्यामुळे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय झाला आहे़ हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. 
 
या निर्णयाला पाठिंबा देणाºया भाजपचे खासदार डॉ़सुनिल गायकवाड यांच्यावरही यावेळी कार्यकर्त्यांनी टिका केली़ शिवाय, लातूरकरांची ओळख असलेली रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा निर्णय रद्द करावा, यासाठी रेल्वे बचाव कृती समितीच्या आंदोलन तीव्र केले जाणार आहे.
 
यावेळी कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेले विस्तारीकरण रद्द करण्यात यावे, बीदर-कुर्ला, हैद्राबाद-पुणे व नांदेड-कुर्ला ही रेल्वे नियमित सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, महापौर अ‍ॅड़ दिपक सूळ, उदय गवारे, शिवाजी नरहरे, पप्पू कुलकर्णी, अभिजित देशमुख, राजेंद्र बनारसे, एस़आऱ देशमुख, समद पटेल, विक्रांत गोजमगुंडे, अशोक गोविंदपूरकर, बसवंतअप्पा भरडे, रविंद्र जगताप, अ‍ॅड़ मनोहर गोमारे, सिकंदर पटेल, दिनेश गिल्डा, अल्ताफ शेख, अ‍ॅड़ देविदास बोरूळे, प्रदिप गंगणे, व्यंकटेश पूरी, मोहन माने, सुपर्ण जगताप, गोपाळ बुरबुरे, राज क्षिरसागर, प्राचार्य मधुकर मुंडे, शेखर हविले, संजय ओव्हळ, प्रा़ पानगावे, सय्यद रफिक, नगरसेविकास सपनाताई किसवे, अकबर शेख, कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, आसीफ बागवान, गौरव काथवटे, कांचन अजनीकर, दगडुअप्पा मिटकरी, दत्ता मस्के, प्रविण घोटाळे, रघुनाथ मदने, बालाजी सिंगापुरे, भगवान माकणे,युसूफ शेख, मोहम्मद खान,मुबश्शिर टाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती़
 
खासदारांच्या पुतळ्याचे दहन
लातूर रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने खा़सुनिल गायकवाड यांच्या पुतळ्याचे गांधी चौकात दहन करण्यात आले़ यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली़  दरम्यान, पोलिसांनी हा पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते आणि पोलिसामध्ये झटापट झाली़
https://www.dailymotion.com/video/x844wk0

Web Title: VIDEO - Statue of MPs burned by activists in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.