VIDEO : वीज वितरणच्या विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Published: September 20, 2016 03:54 PM2016-09-20T15:54:59+5:302016-09-20T15:54:59+5:30

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील दोन रोहित्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहेत.

VIDEO: Stop the way of villagers against power distribution | VIDEO : वीज वितरणच्या विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको

VIDEO : वीज वितरणच्या विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको

Next
ऑनलाइन लोकमत
किन्हीराजा, दि. २० -   मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील दोन रोहित्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहेत. त्यामुळे गावातील आदिवासी वस्ती, बंजारा वस्तीसह वार्ड क्र.३ व ४ मधील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून, मागील दोन  महिन्यांपासून अर्धेअधिक गाव दररोज अंधारातच राहत असल्याने २० सप्टेंबर रोजी ्रग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांसह गावकºयांनी औरंगाबाद-नागपूर हायवेवर  रास्ता रोको करुन आपला रोष व्यक्त केला. अखेर महावितरण कंपनीला नमून लेखी आश्वासन देण्याची वेळ आली. लवकरचं वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.
 किन्हीराजा गावाचा ७५ टक्के वीजपुरवठा हा बंदच राहत असल्यामुळे जनतेचा मोठ्या प्रमाणात द्धास होत असून वीजपुरवठा नियमित चालू ठेवून नवीन रोहित्र द्यावे व भारनियमन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी २० सप्टेंबर रोजी औरंगाबाद-नागपूर हायवेवर महावितरणच्या ३३ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यााचा इशारा सरपंच  वेणुताई जामकर, उपसरपंच संजय डिवरे व ग्रामपंचायत सदस्य व महिलांनी दिला होता.
गेल्या ४ महिन्यांपासून गावात वीजेचा लपंडाव सुरू आहे. गावातील विजयंत्रणा सुरळीत चालू ठेवून शेती सिंचनाला व गावाला नियमितपणे वीजपुरवठा द्यावा यासाठी सरपंच जामकर, उपसरपंच संजय डिवरे यांनी ३१ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या ठरावासह वीज पुरवठा सुरळीत करुन गावात सिंगल फेज योजना वीज पुरवठा सुरळीत करण्यास कुचकामी ठरत आहे. 
त्यामुळे गावातील वीज पुरवठा हा गावठाण फिडरवरुन  करावा व शेती सिंचनासाठी थ्री फेज वीज पुरवठा नियमित द्यावा यासाठी महावितरण कंपनीने प्रयत्न करावे यासाठी ग्रामपंचायतच्या ठरावासह मागणी कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार केली होती. सोबतच १७ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले होते; परंतु त्यावेळी दिलेले आश्वासन अधिका-यांनी अद्यापही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे किन्हीराजा गावात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव वाढला असून दररोज अर्धेअधिक गाव अंधारातच राहत होते. साध्या कारणांमुळेही विज पुरवठा वारंवार बंद राहतो. लोड वाढल्यामुळे गावातील २ रोहित्र जळाले. परंतु दोन महिन्यापासून नवीन रोहित्र मिळाले नाही. गावात कायमस्वरुपी लाईनमन राहत नाही. यासह अनेक अडचणी ग्रामस्थांच वाढल्याने २० सप्टेंबर रोजी शेकडो ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन आपला रोष व्यक्त केला.
त्यामुळे २० सप्टेंबर पुर्वी किन्हीराजा गावासाठी स्वतंत्र गावठाण फिडर चालू करावे, कालबाह्य झालेली सिंगलफेज योजना गावातून काढून टाकावी व नवीन थ्री फेजचे रोहित्र गावात द्यावे व भारनियमन किन्हीराजा गावात न होता सर्वच फिडरसोबत किन्हीराजा गाव चालवावे, गावात पडलेले विजेच्या तारेवरचे झोळ काढून नवीन वीज प्रवाहाचे तार टाकावे या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गोदमले, सरपंच वेणुताई जामकर, उपसरपंच संजय डिवरे व उध्दव पाटील गोडे यांच्यासह ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले होते.
 
  

Web Title: VIDEO: Stop the way of villagers against power distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.