VIDEO : हजारो भाविकांच्या साक्षीने सिंहस्थ पर्वणीची सांगता
By admin | Published: August 11, 2016 07:06 PM2016-08-11T19:06:30+5:302016-08-11T19:11:22+5:30
हजारो भाविकांच्या साक्षीने प्रकाशा येथील गौतमेश्वर मंदीरावर ध्वज विसर्जन करून सिंहस्थ पर्वणीची सांगता झाली. गौतमेश्वर मंदीर आता पुढील सिंहस्थ पर्वणीपर्यंत अर्थात
ऑनलाइन लोकमत
प्रकाशा, दि.11 - हजारो भाविकांच्या साक्षीने प्रकाशा येथील गौतमेश्वर मंदीरावर ध्वज विसर्जन करून सिंहस्थ पर्वणीची सांगता झाली. गौतमेश्वर मंदीर आता पुढील सिंहस्थ पर्वणीपर्यंत अर्थात १२ वर्षांसाठी बंद राहणार आहे.
प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र प्रकाशा येथे कन्यापर्वकाळाच्या मुहूर्तावर सिंहस्थ पर्वणीची सांगता करण्यात आली. गेल्यावर्षी १४ जुलै रोजी सिंहस्थ पर्वणीचा पवित्र ध्वज गौतमेश्वर मंदीरावर चढविण्यात येवून पर्वणीला सुरुवात झाली होती. वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रम पार पडले. या पर्वणीची सांगता ११ आॅगस्ट रोजी विधिवत करण्यात आली. सकाळी साडेसात वाजेपासून मानकरी मनोज बन्सी पाटील व सौ.छायाबाई पाटील यांच्यासह महामंडलेश्वर रामानंदपुरीजी महाराज यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान केदारेश्वर मंदीरावर देखील ध्वज चढविण्यात आला. सायंकाळी चार वाजता रॅली गौतमेश्वर मंदीराजवळ आली. तेथे पार्वती ध्वज मंदीरावर लावण्यात आला. त्यानंतर पर्वणी शुभारंभाचा ध्वज काढून त्याचे स्थान केल्यानंतर तो ध्वजही चढविण्यात आला. मंत्रोच्चरात आणि धार्मिक विधी करीत या पर्वाची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील हजारो भाविक उपस्थित होते.
भाविकांच्या सोयीसाठी प्रकाशा ग्रामपंचायत, सिहंस्थ समिती, जिल्हा प्रशासन यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांतर्फे उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.