VIDEO- कळव्यात 35 हजार झोपडपट्टीवासीयांचा धडक मोर्चा
By Admin | Published: December 26, 2016 02:07 PM2016-12-26T14:07:15+5:302016-12-26T15:11:46+5:30
ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 26 - ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत असणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला ...
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 26 - ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत असणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ सुमारे 35 हजार झोपडीधारकांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा नाका येथे मोर्चा नेला. दरम्यान, यावेळी आ. आव्हाड यांनी शिवसेना- भाजपवर टीका केली. या सत्ताधाऱ्यांना ठाण्याचे स्मशान करायचे आहे.
पण, लक्षात ठेवा या सुंदर स्मशानात सेना- भाजपची चित्ता ठाणेकरच रचतील, असा इशारा यावेळी आ. आव्हाड यांनी दिला. ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील झोपड्यांवर कारवाई करण्याचा निऱ्णय घेतला असता, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवून या कारवाईला स्थगिती मिळवली होती. मात्र, महासभेमध्ये सेना- भाजपने ठराव करुन सदर झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याच्या निषेधार्थ सोमवारी हा मोर्चा काढण्यात आला. मनिषा नगर, जानकी नगर, खारीगाव, घोळाई नगर, आतकोनेश्वर नगर आदी भागातील सुमारे 35 हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मनिषा नगरमधून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामुळे नवी मुंबई आणि रेतीबंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. यावेळी आ. आव्हाड यांनी पालिका प्रशासनावर टीका केली.
2000 पर्यंतच्या झोपडयांना अभय देण्याचा कायदा असतानाही 80 वर्षांपूर्वीच्या झोपडया पाडण्याचा घाट घातला आहे.
शहर सुंदर करण्याच्या नादात प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी लोकांना बेघर करीत आहेत. या सत्ताधाऱ्यांनी सौंदर्याची व्याख्या काय केली आहे, हे सांगणे अवघड आहे. बायकोच्या गालावर मुरुम आला तर सुंदर बायकोला घटस्फोट देण्याचाच हा प्रकार आहे. मात्र, या भागातील डकही झोपडी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावरच उतरु; हे शहर आमच्या घामाने सजले आहे.
त्यामुळे जर गोरगरीबांना बेघर केले. तर, हे गोगरीब बंड करतील आणि त्यातून हे सत्ताधारी नगरसेवक माजी नगरसेवक म्हणून गणले जातील. झोपडया पाडून आयुक्त जयस्वाल, ठराव मांडणारे भाजपचे मिलींद पाटणकर आणि अनुमोदन देणाऱ्या सेनेच्या अनिता गौरी यांना या शहराचे सुंदर स्मशानात रुपांतर करायचे आहे. पण, त्यांनी लक्षात ठेवावे; या स्मशानात सेना- भाजपची चिता रचल्याशिवाय हा गरीब माणूस स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
या वेळी हजारो झोपडीधारकांसह मनोहर साळवी, मिलींद पाटील, मनाली पाटील, अपर्णा साळवी, महेशश साळवी, रिटा यादव, अक्षय ठाकूर, मुकूद केणी, प्रमिला केणी आदी मान्यवर उपथित होते.
{{{{dailymotion_video_id####x844mir}}}}
(छायाचित्र- विशाल हळदे)