VIDEO: वाहतूक नियमनासाठी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार
By admin | Published: October 2, 2016 05:17 PM2016-10-02T17:17:04+5:302016-10-02T20:28:20+5:30
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शहरातील विविध चौकात वाहतुक नियमनासाठी पुढाकार घेतला. पिंपरीतील चौकात सिग्नलजवळ वाहन चालकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ
Next
संजय माने/ऑनलाइन लोकमत
पिंपरी,दि. 2- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शहरातील विविध चौकात वाहतूक नियमनासाठी पुढाकार घेतला. पिंपरीतील चौकात सिग्नलजवळ वाहन चालकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ थांबण्याच्या सूचना विद्यार्थी देत होते. एरवी वाहनचालकांचा बेशिस्तपणा दिसून येणाºया चौकात सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी दीडपर्यंत कमालीची शिस्त दिसून आली. कधी नव्हे ते रविवारी (आज) अनेक पादचारी झेब्रा क्रॉसिंगवरून जात असल्याचे दृश्य पहावयास मिळाले.
वाहने सावकाश चालवा, वाहतूक नियमांचे पालन करा असे फलक हातात घेऊन विद्यार्थी चौका चौकात थांबले होते. पिंपरीतील डी वाय पाटील महाविद्यालय तसेच पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक चे विद्यार्थी, विद्यार्थीनी या उपक्रमात सहभागी झाले होते. वाहनचालकांशी हुज्जत न घालता ते फलक घेऊन रस्त्याच्या बाजुला थांबत होते. हातात फलक घेतलेले विद्यार्थी पाहून वाहनचालकसुद्धा वाहतुक नियमांचे पालक करत होते. रविवार सुटीचा दिवस असताना, विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
निगडी ते पिंपरी दरम्यान प्रत्येक चौकात वाहतुक पोलिसांऐवजी विद्यार्थीच दिसून आले. वाहतुक नियमनासाठी विद्यार्थी सरसावल्याचे पाहून नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या उपक्रमामुळे पादचाºयांना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करता आला. सुरक्षितरित्या रस्ता ओलांडणे शक्य झाले. प्रमुख चौकांमध्ये वाहतुक शाखेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाल्यास संबंधी वाहन चालकाला घरपोच दंडाची नोटीस पाठवली जाते. हे माहिती असूनही वाहनचालक नियम पाळत नाहीत. वाहतुक नियमन करणाºया विद्यार्थ्यांमुळे मात्र वाहनचालकांची शिस्त दिसून आली.