VIDEO : असे आहे राज ठाकरे यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक
By संजय पाठक | Published: August 2, 2017 07:17 PM2017-08-02T19:17:27+5:302017-08-02T19:21:54+5:30
नाशिक, दि. 2 - बाळासाहेब ठाकरे म्हटले की धगधगती ज्वाला, अंगारच, त्यामुळेच ठाकरे यांचे स्मारक शस्त्राशी जोडणे योग्यच अशा ...
नाशिक, दि. 2 - बाळासाहेब ठाकरे म्हटले की धगधगती ज्वाला, अंगारच, त्यामुळेच ठाकरे यांचे स्मारक शस्त्राशी जोडणे योग्यच अशा भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यामुळेच नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शस्त्रसंग्रहालय साकारले आहे. नाशिक शहरातील जुन्या गंगापूररोडवर असलेल्या पंपींग स्टेशनच्या जागेत हे संग्रहालय नाशिक महापालिका आणि जीव्हीके कंपनीच्या मदतीने हे शस्त्रसंग्रहालय साकारले असून जानेवारी महिन्यात त्याचे उदघाटन करण्यात आले आहे.
शिवरारांच्या काळातील ढाल तलवारी, भाले अशी शस्त्रे त्याकाळातील शौर्याचे दर्शन घडवतात. शिवाय पावनखिंडीच्या लढाईसह अनेक घटनांची चित्रे वासुदेव कामत यांनी रेखाटली असून त्यामुळे शिवरायांचा काळच जागृत होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे शिवरायाचे मनोगत! एका छोट्याच्या पुतळ्यावर एलईडीच्या इफेक्टने शिवराय बोलत आहेत, असा अभास निर्माण केला जातो आणि तो अत्यंत चपखल असल्याने तो पहाण्यासाठी गर्दी होत
असते. दर्यावर्दींना संरक्षणासाठी सज्ज करणारे शिवरायांचे मनोगत अंगावर रोमांच उभे करते. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीच आपल्या संग्रहातून अनेक पुरातन शस्त्रे दिली आहेत हे विशेष होय.