VIDEO - रंगभूमी स्त्री विभागात सुकन्या कुलकर्णी-मोने ठरल्या "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

By Admin | Published: April 11, 2017 06:45 PM2017-04-11T18:45:24+5:302017-04-11T23:07:57+5:30

सुकन्या कुलकर्णी-मोने यांना रंगभूमी स्त्री विभागातील यंदाचा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे.

VIDEO - Sukanya Kulkarni-Mone in the theater section of the state "Lokmat Maharashnan of the Year" | VIDEO - रंगभूमी स्त्री विभागात सुकन्या कुलकर्णी-मोने ठरल्या "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

VIDEO - रंगभूमी स्त्री विभागात सुकन्या कुलकर्णी-मोने ठरल्या "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 11 - नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकेतून आपल्या अभिनयकौशल्याने रसिकप्रेक्षकंची मने जिंकणा-या सुकन्या कुलकर्णी-मोने यांना रंगभूमी स्त्री विभागातील यंदाचा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉक्टर उल्हास पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
"लोकमतसोबत वेगळं नात आहे, लोकमत फक्त पेपर नाहीय", अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुकन्या यांनी दिली.  
 
रंगभूमी स्त्री विभागात हेमांगी कवी, शुभांगी मोहन गोखले, मुक्ता बर्वे आणि स्पृहा जोशी यांना यांना नामांकने जाहीर झाली होती. मात्र सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी बाजी मारली. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. 
(कला क्षेत्रात संदीप पिसाळकर यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारा"ने गौरव)
(परफॉरमिंग आर्ट क्षेत्रात अशोक हांडे यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने सन्मान)
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
facebook.com/lokmat
सुकन्या कुलकर्णी-मोने यांचा प्रवास 
आपणच काढलेला आपला फोटो म्हणजे ‘सेल्फी.’ याच नावाच्या नाटकाने मराठी रंगभूमीवर आपले वेगळे स्थान कमावले असून, त्यात कडक शिस्त असणा-या स्वाती कवठेकरने रसिकांवर राज्य केले. ही भूमिका साकारली आहे सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी. स्वभावगुणांची काही वैशिष्ट्ये असतात. त्याला साजेसे काही कलाविष्कार करण्याची संधी मिळाली, तर त्या व्यक्तिरेखेला सहजसुंदरतेची झालर लागते. ‘सेल्फी’ नाटकातील शिस्तप्रिय स्वाती साकारताना, ही सहजता सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्या अभिनयाचे बलस्थान ठरली आहे. नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकेतून आपल्या अभिनयकौशल्याने रसिकमने जिंकणारी सुकन्या कुलकर्णी मोने म्हणजे, कडक शिस्तीचे एक आगळेवेगळे रसायन. अशाच तिच्या स्वभावातील अंतरंगात डोकावणारं नाटक ‘सेल्फी’. या नाटकात तिने स्वाती कवठेकर ही भूमिका साकारली. वेगवेगळ्या स्वभावाच्या पाच मैत्रिणी रेल्वे स्टेशनवरील वेटिंगरूममध्ये भेटतात आणि तिथेच हे नाटक जन्माला येते. त्या मैत्रिणींचे भावविश्व मांडणा-यांपैकी नर्स असूनही, शिक्षिकेची कडक शिस्त असणा-या स्वाती कवठेकरने रसिकांवर राज्य केले. गुरू सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे भरतनाट्यम् शिकत असताना ‘दुर्गा झाली गौरी’ या ‘आविष्कार’च्या नाटकाद्वारे सुकन्या कुलकर्णी यांनी रंगमंचावर पदार्पण केले. त्यानंतर, ‘झुलवा’ आले. वामन केंद्रे यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक बरेच गाजले. या नाटकातल्या अप्रतिम अभिनयासाठी सुकन्याला अनेक पारितोषिके मिळाली. ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकानेही पुढे इतिहास घडवला. "कश्मकश", "शांती", "महानगर" अशा मालिकांमधून आणि "ईश्वर", "एकापेक्षा एक", "वारसा लक्ष्मीचा", "सरकारनामा" अशा चित्रपटांमधून त्यांचा सहजसुंदर अभिनय दिसून आला. "सरकारनामा" आणि "वारसा लक्ष्मीचा" या चित्रपटांसाठी सुकन्याला फिल्मफेअर पारितोषिकेही मिळाली. ‘फॅमिली ड्रामा’ या नाटकाद्वारे ब-याच काळानंतर सुकन्याने व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केले. या नाटकातल्या सुमती करमरकर या त्यांच्या भूमिकेचे एकमुखानं कौतुक झाले. रोजच्या ताणतणावांवर उतारा म्हणून सुमती जे काही उपाय योजते ते भन्नाट आहेत. आता ‘सेल्फी’तूनही त्या स्वाती कवठेकरच्या रूपाने कडक शिस्तीचे महत्त्व सांगताहेत. त्याचे कौतुक होत आहे.
 
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
lmoty.lokmat.com

Web Title: VIDEO - Sukanya Kulkarni-Mone in the theater section of the state "Lokmat Maharashnan of the Year"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.