VIDEO - सुर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 09:22 PM2016-11-10T21:22:54+5:302016-11-10T21:22:54+5:30
ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 10 - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुस-या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. महाद्वारपासून ...
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुस-या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. महाद्वारपासून प्रवास करत किरणांनी ५ वाजून ४९ मिनिटांना अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत येवून लुप्त झाली. आज किरणोत्सवाचा अखेरचा दिवस असून सुर्यकिरणांची तीव्रता चांगली राहिली तर किरणे मूर्तीच्या चेह-यावर येवून किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता होती.
अंबाबाईच्या किरणोत्सवाला बुधवारपासून सुरवात झाली. मात्र लिप इअर असेल तेंव्हा किरणोत्सव ८ नोव्हेंबरपासून सुरु होतो. त्यानुसार मंगळवारी किरणे अंबाबाई मूर्तीच्या चरणापर्यंत बुधवारी कमरेपर्यंत आणि गुरुवारी गळ्यापर्यंत आली.
गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी सुर्यास्त होता. ४ वाजून ४८ मिनिटांनी महाद्वार रोडपासून सुरु झालेला किरणांचा प्रवास ५ वाजून ४९ मिनिटांनी अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत येवून पुर्ण झाला. त्यानंतर किरणांची तीव्रता कमी होवून ती लुप्त झाली. यावेळी सुर्यकिरणांची तीव्रता १५ लक्स इतकी होती. गुरुवारी सुर्यकिरणांची तीव्रता चांगली होती. आकाश स्वच्छ आणि निरभ्र होते. ही तीव्रता आज देखील अशीच राहिली तर किरणे अंबाबाई मूर्तीच्या चेह-यावर पडून किरणोत्सव पूर्ण होवू शकेल अशी माहिती प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली.
किरणांचा प्रवास असा..
४ वाजून ४८ मिनिटे : महाद्वार
५ वाजून ८ मिनिटे : गरुड मंडप
५ वाजून ३३ मिनिटे : पितळी उंबरा
५ वाजून ३६ मिनिटे : खजिना चौक
५ वाजून ३९ मिनिटे : पहिली पायरी
५ वाजून ४० मिनिटे : दुसरी पायरी
५ वाजून ४२ मिनिटे : तिसरी पायरी
५ वाजून ४५ मिनिटे : अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श
५ वाजून ४६ मिनिटे : कमरेपर्यंत
५ वाजून ४८ मिनिटे : मूर्तीच्या छातीपर्यंत
५ वाजून ४९ मिनिटे : अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत
२ मिनिटे वाढायला हवी
सुर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहºयावर येण्यासाठी आणखी दोन मिनिटांचा कालावधी मिळणे गरजेचे आहे. सुर्यकिरणांची तीव्रता कमी असली तरी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होण्यासाठी किरणांच्या मार्गातील अडथळे काढणे गरजेचे आहे.
प्रा. किशोर हिरासकर
https://www.dailymotion.com/video/x844hk7