VIDEO : कांदा आंदोलनासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक, राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Published: March 7, 2017 12:07 PM2017-03-07T12:07:50+5:302017-03-07T13:20:42+5:30

कांद्याला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी 'स्वाभिमानी शेतकरी संघटने' च्या वतीने मंगळवारी विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन करण्यात आले.

VIDEO: 'Swabhimani' aggressor for the agitation, Raju Shetty is in police custody | VIDEO : कांदा आंदोलनासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक, राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

VIDEO : कांदा आंदोलनासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक, राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - कांद्याला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी 'स्वाभिमानी शेतकरी संघटने' च्या वतीने मंगळवारी विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कांदे फेकत घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 
दरम्यान या आंदोलनासाठी सदाभाऊ खोत अनुपस्थित असल्याने शेतकरी संघटनेतील तसेच खोत -शेट्टी यांच्यातील दुही पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारी सुरूवात झाली असून शेतमालाच्या भावावरुनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी कांद्यासाठी कार्यकर्त्यांसह विधान भवनाजवळ आंदोलन केले. काही कार्यकर्त्यांनी कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेधही दर्शवला. 
 
 

Web Title: VIDEO: 'Swabhimani' aggressor for the agitation, Raju Shetty is in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.