VIDEO : जळगावात काढली मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By Admin | Published: June 5, 2017 12:26 PM2017-06-05T12:26:12+5:302017-06-05T13:29:17+5:30

शेतकरी मागण्या पूर्ण करण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून उंबरखेडच्या शेतक-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

VIDEO: The symbolic funeral of Chief Minister, who was removed from Jalgaon | VIDEO : जळगावात काढली मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

VIDEO : जळगावात काढली मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

जळगाव,दि.5 - शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (5 जून) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकरी बैलगाड्या, जनावरे आणि संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरले आहेत.
 
शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांची  पूर्तता करण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून संपात सहभागी झालेल्या उंबरखेडमधील शेतक-यांनी सोमवारी (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
 
या अंत्ययात्रेत उपसरपंच सोमनाथ निकम, वाल्मिक पाटील, संजय पाटील,  दीपक खंडाळे, शिवसेना युवा मोर्चाचे भरत पाटील, ग्रा.पं सदस्य जितेंद्र पाटील, सुनिल अहिरे, प्रमोद पाटील, महादु महाजन, राहुल गोसावी आदी शेतकरी सहभागी झाले होते.
 
शेतकरी संपाचे राज्यभरातील परिणाम
 
सोलापूर - सांगोला शहर तालुक्यात शेतक-यांनी कडकडीत बंद पाळला आहे. दूध संकलन, भाजीपाला, फळे विक्रीस न आल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  तसंच बाजार समितीतील भाजीपाल्याची आवकही मंदावली आहे. यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत.  
 
दूध पंढरी दूध संकलनानं शेतक-यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तर पहाटेच्या सुमारास मानेगाव येथे शेतक-यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. 
 
पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळ्यासह अनेक ठिकाणी शेतक-यांचे रास्तारोको आंदोलन सुरू आहे.  
 
सांगली  - शेतक-यांच्या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. 
 
काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला जात आहे. सार्वेड येथे बंदला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. आंदोलकांनी याठिकाणी वाहनांचे टायर जाळले आहेत. वाळला तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, कडेगाव तालुक्यातील वांगी, आसद, देवराष्ट्रे, जत तालुक्यातील वाळेखिंडी परिसरात कडकडीत बंद आहे.
 
तासगावात गाव बंद ठेवून कर्जमाफीबाबत घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी फेरीदेखील काढली.
 
हिंगोली - शेतक-यांच्या राज्यव्यापी बंदमध्ये शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. हिंगोलीमध्ये शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे.
 
यवतमाळ -नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अर्जुना येथे शेतकऱ्याचा रास्ता रोको सुरू आहे. शेतकरी वारकरी संघटनेने या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे यवतमाळ - आर्णी मार्गावरील वाहतूक सकाळी 9 वाजताल्यापासून ठप्प आहे. 
 
अहमदनगर - पारनेर तालुक्यातील निघोज येथे शेतक-यांनी गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं.  दूध रस्त्यावर न ओतता त्यांनी दुधाचे गोरगरिबांमध्ये वाटप केले. तर दहिगाव बोलका येथील नागपूर-मुंबई हायवेवर शेतमालाची वाहनं अडवून मिरच्यांची पोती रस्त्यावर ओतण्यात आली.

Web Title: VIDEO: The symbolic funeral of Chief Minister, who was removed from Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.