VIDEO : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पो जळून खाक, वाहतूक मंदावली
By admin | Published: September 29, 2016 09:39 AM2016-09-29T09:39:40+5:302016-09-29T11:35:32+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील वाहतूक मंदावली आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वेवर अमृतांजन पुलाजवळ एका ट्रकने आज सकाळी अचानक पेट घेतला.
Next
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. २९ - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास खंडाळा बोरघाटात एका टेम्पोेने अचानक पेट घेतल्याने तो पुर्णपणे जळून खाक झाला. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतुक दोन तास ठप्प झाली होती.
खोपोली महामार्ग पोलीस व आयआरबीच्या अधिकार्यांनी सांगितले की टेम्पो क्र. (एचआर ६१ बी १२४३) हा सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, विद्युत साहित्य व कपडे घेऊन पुण्याकडे येत असताना घाटातील चढणीवर टेम्पोला शाँर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने तो साहित्यासह जळून खाक झाला. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला. साडेनऊच्या सुमारास आयआरबी कंपनीचे ३ अग्नीशमन बंब व खोपोली नगरपरिषदेचा १ अग्नीशमन बंब च्या सहाय्याने सदर आग विझविण्यात आल्यानंतर वाहतुक सुरु करण्यात आली. दरम्यान विस्कळीत झालेली वाहतुक पुर्वपदावर येण्यास आजुन तासभर लागेल असे महामार्ग पोलीसांनी सांगितले.