VIDEO - शेतीच त्यांचा संसार; गुरं झाली मुलंबाळं !

By Admin | Published: November 4, 2016 06:11 PM2016-11-04T18:11:16+5:302016-11-04T18:11:16+5:30

 ऑनलाइन लोकमत/सुनील काकडे वाशिम, दि. 04 - बी.ई. इन सिव्हिल झाल्यानंतर परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली; पण मातृभुमीची ओढ ...

VIDEO - Their world of agriculture; The boys were saved! | VIDEO - शेतीच त्यांचा संसार; गुरं झाली मुलंबाळं !

VIDEO - शेतीच त्यांचा संसार; गुरं झाली मुलंबाळं !

Next

 ऑनलाइन लोकमत/सुनील काकडे

वाशिम, दि. 04 - बी.ई. इन सिव्हिल झाल्यानंतर परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली; पण मातृभुमीची ओढ आणि भुमातेशी जुळलेलं नातं स्वस्थ बसू देईना. त्यामुळे मनाशी पक्की खूनगाठ बांधली आणि नोकरी सोडून शेतीची कास धरली. आता तर शेतीच त्यांचा संसार आणि गुरं मुलंबाळं झाल्यागत प्रेरणादायी चित्र पाहायला मिळते. रवि मारशेटवार या इसमाचे नाव. 
वाशिमचे रवि मारशेटवार हे जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांना, पशूपालकांना, फळ उत्पादकांना परिचित असलेलं नाव. ८ वर्षांपूर्वी वाशिमपासून नजिकच असलेले माळेगांव दत्तक घेऊन त्यांनी शेतक-यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य आरंभिले. 
स्वत: अविवाहित राहून आपले संपूर्ण आयुष्य शेती अन् शेतक-यांसाठी अर्पण करणा-या रवि यांनी गीर प्रजातीच्या देशी गोपालनावर भर दिला असून ते आपल्या शेतीत विविधांगी प्रयोग करत राहतात.
 
https://www.dailymotion.com/video/x844grq

Web Title: VIDEO - Their world of agriculture; The boys were saved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.