VIDEO : म्हणून आजचा दिवस आहे 'पोलीस शहीद दिन'...
By admin | Published: October 21, 2016 10:12 AM2016-10-21T10:12:11+5:302016-10-21T12:54:04+5:30
२१ ऑक्टोबर १९५९ साली भारत चीन सीमेवरील लद्दाख भागात हाट स्प्रिंग इथे 16 हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान सीमेचे रक्षण करत असतानाच चीनी सैन्याने हल्ला केला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - २१ ऑक्टोबर १९५९ साली भारत चीन सीमेवरील लद्दाख भागात हाट स्प्रिंग इथे 16 हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान सीमेचे रक्षण करत असतानाच चीनी सैन्याने हल्ला केला व त्यात पोलीस दलाचे जवान शहीद झाले. अपुरे शस्ञ आणि अपुरे मनुष्यबळ असतानाही या जवानांनी चीनी जवानांशी लढत चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हापासूनच संपूर्ण भारतातील पोलीस दल तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलासह, निमलष्करी दल आणि सैन्याचे जवान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी '२१ ऑक्टोबर' हा दिवस 'पोलीस शहीद दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिवसाच्या निमित्ताने आज नायगाव पोलीस मैदानावर खास पोलिस परेडचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पोलिस महासंचालक सतीशकुमार माथूर, मुंबई पोलिस आयुक्त दत्त पडसलगीकर यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी हजर होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.