VIDEO - राजूर घाट परिसरात पर्यटकांची मांदियाळी

By Admin | Published: August 23, 2016 05:41 PM2016-08-23T17:41:29+5:302016-08-23T17:41:29+5:30

शहराला लागून असलेल्या बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

VIDEO - Tourist places in the Rajur Ghat area | VIDEO - राजूर घाट परिसरात पर्यटकांची मांदियाळी

VIDEO - राजूर घाट परिसरात पर्यटकांची मांदियाळी

googlenewsNext

हर्षनंदन वाघ

बुलडाणा, दि. २३ : शहराला लागून असलेल्या बुलडाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे खास सुटी काढून
परिसरातील पर्यटनप्रेमी निसर्गाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत.

अजिंठ्याच्या डोंगरात वसलेल्या बुलडाणा शहर परिसराला अलैकिक सौंदर्याची देण असल्यामुळे इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात येथूनच जिल्ह्याचा कारभार सुरू केला होता. दरम्यान स्वातंत्र्यानंतर बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. आजरोजी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी शहर परिसरात असलेले नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी परिसरातील पर्यटक प्रेमींना
खुणवत असते.

बुलडाणा शहरातून मलकापूरकडे जात असताना सर्वप्रथम व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे. तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत. राजूर घाटात एका वळणावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या ठिकाणाहून बुलडाणा शहर परिसर तसेच राजूर घाटातील डोंगराचे सौंदर्य निहाळता येते. त्यानंतर मोताळा तालुक्यातील राजूर गावाकडे जाताना घाटातच दुर्गामात मंदिर आहे.

या परिसरात खोल दरीतील पाणी साठवलेला नाला, सर्वत्र डोंगराने पांघरलेला हिरवा शालू तसेच मोताळा शहरासमोर असलेल्या नळगंगा धरणाचे पाण्याचे विशाल पात्र निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घातले. या ठिकाणाहून सुर्येदय तसेच सुर्यास्तचे दर्शन घेताना वेगळी अनुभुती मिळते. त्यानंतर मोहेगाव समोर असलेल्या तालुका पर्यटन केंद्र तसेच त्यापुढे असलेल्या जमिनीखाली १५ फुट खोल असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. या परिसरात नळगंगा नदीचे वाहणारे पाणी, परिसरातील हिवराई मनाला सुखावून जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात बुलडाणा शहर परिसरातील अजिंठ्याच्या डोंगरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना हाक देत असते. या ठिकाणी इतर जिल्ह्यातील येणारे पर्यटकांनी भेट दिल्यास परत परत येथील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.

या ठिकाणी होत आहे पर्यटकांची गर्दी
बुलडाणा शहरालगत असलेल्या वनविभागाचा सनसेट पॉर्इंट व्यंकटगिरी, राजूर घाटातील, संकटमोचन हनुमान, बुलडाणा अर्बन सनसेट पॉर्इंट, दुर्गामाता मंदिर, राजूर येथील महादेव मंदिर, खामखेड जवळ अणारे नळकुंड येथे पर्यटक भेट देवून निसर्गाचा आनंद घेत आहेत. 

Web Title: VIDEO - Tourist places in the Rajur Ghat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.