VIDEO: जगदंबा उत्सवात पेटलेल्या ‘भंदे’ची परंपरा
By admin | Published: October 24, 2016 06:51 PM2016-10-24T18:51:10+5:302016-10-24T18:51:10+5:30
सण-उत्सवात परंपरा बदलत असल्याची ओरड होत असताना शहरात जगदंबा उत्सवात ‘भंदे’ची परंपरा मात्र काही मंडळांनी पूर्वावार जोपासली आहे.
Next
गिरीश राऊत / ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 24 - सण-उत्सवात परंपरा बदलत असल्याची ओरड होत असताना शहरात जगदंबा उत्सवात ‘भंदे’ची परंपरा मात्र काही मंडळांनी पूर्वावार जोपासली आहे. खामगाव शहरात कोजागिरी पौर्णिमेपासून राज्यात एकमेव असा जगदंबा उत्सव साजरा होत असतो. शहर व परिसरात शेकडो मंडळांकडून हा उत्सव अनेक दशकांपासून होत आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे देवीसमोर ‘भंदे’ खेळले जातात. ‘भंदे’ म्हणजे टोपल्यासारख्या मातीच्या खोलगट व पसरट भांड्यात सरकी टाकून ती पेटविली जाते. सरकी पेटल्यानंतर हे पेटलेले भंदे दोन्ही हातावर घेवून फिरविली जातात. ‘भंदे’ खेळण्यातील कसब म्हणजे पेटलेली सरकी या भांड्यातून अंगावर पडू नये याची दक्षता घेतली आहे. तसेच गरम भांडे हातावर ठेवून खेळले जाते. हा प्रकार येथे जगदंबा उत्सवातच आढळून येतो. शहरातील जुन्या वस्तीमधील वृध्दापासून बालक सुध्दा भंदे फिरविण्यात पारंगत झाले आहेत.
पूर्वीच्या काळी जगदंबा मिरवणुकीच्या सर्वच मार्गावर रात्रीच्यावेळी उजेडासाठी व्यवस्था नसायची. त्यावेळी भंदयांचा उपयोग उजेडासाठीही होत असे. नदीपात्रात देवीचे विसर्जन करताना पेटलेली भंदी आकर्षण असायची.