VIDEO: वाशी पुलावरील अपघातामुळे मुंबईत ट्राफिक जाम
By Admin | Updated: September 16, 2016 14:42 IST2016-09-16T12:43:46+5:302016-09-16T14:42:43+5:30
वाशीच्या खाडी पुलावर ट्रकचा अपघात झाला आहे. मात्र या अपघातामुळे पनवेल - सायन हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.

VIDEO: वाशी पुलावरील अपघातामुळे मुंबईत ट्राफिक जाम
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - वाशीच्या खाडी पुलावर ट्रकचा अपघात झाला आहे. अपघातामुळे पनवेल - सायन हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. खारघरहून वाशी, मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने लोकांना ट्राफिकमध्येच ताटकळत बसावे लागत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सकाळपर्यंत विसर्जन सुरु असल्याने अगोदरच वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी पवई तलावात विसर्जन सुरू असल्याने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.