VIDEO- केमिकल वाहून नेणारा ट्रक अपघातानंतर आगीच्या विळख्यात

By Admin | Published: December 30, 2016 09:46 PM2016-12-30T21:46:50+5:302016-12-30T22:02:53+5:30

ऑनलाइन लोकमत अमरावती, दि. 30 - बडनेरालगतच्या लोणी टाकळी गावाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत ...

VIDEO-TRAVEL TRUCK | VIDEO- केमिकल वाहून नेणारा ट्रक अपघातानंतर आगीच्या विळख्यात

VIDEO- केमिकल वाहून नेणारा ट्रक अपघातानंतर आगीच्या विळख्यात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 30 - बडनेरालगतच्या लोणी टाकळी गावाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत केमिकल असलेल्या ट्रकला आग लागली. या आगीत या ट्रकचे चालक-वाहक ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त असून त्याला पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही. घटनास्थळी केमिकलमुळे आग भडकली असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. घटनास्थळावर आगीचे मोठमोठे लोळ उठत आहे.
शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर अमरावती-अकोला राज्य महामार्गावर असलेल्या लोणी टाकळी गावातील चौकामध्ये ही आग लागली आहे. आगीमुळे दोन्ही दिशेची वाहतूक सुमारे पाच किलोमीटरच्या अलिकडे थांबविण्यात आली आहे. अमरावती येथून अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून, लोणी पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातानंतर सिलिंडरच्या ट्रकला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमरावती महापालिकेच्या अग्निशमन दलाचे फायरमन चौखंडे, उताणे, पालने, इंगोले, सुर्यवंशी, पंधरे, गजभार, वाहन चालक पंधरे, सारीक अहमद, काकडे यांचे पथक आग विझविण्यासाठी गेले आहे. अमरावती व्यतिरिक्त बडनेरा, नांदगाव खंडेश्वर आदी ठिकाणच्या दहावर गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहे.

https://www.dailymotion.com/video/x844mwo

Web Title: VIDEO-TRAVEL TRUCK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.