VIDEO - अकोल्यात तुलसी विवाह सुद्धा सामुहिक

By Admin | Published: November 13, 2016 12:25 PM2016-11-13T12:25:00+5:302016-11-13T14:05:55+5:30

प्रविण ठाकरे  अकोला, दि. १३ - सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज झाली असून आता या पद्धतीचे लोणं वाढते आहे. ...

VIDEO - Tulsi marriage also a community in Akola | VIDEO - अकोल्यात तुलसी विवाह सुद्धा सामुहिक

VIDEO - अकोल्यात तुलसी विवाह सुद्धा सामुहिक

Next

प्रविण ठाकरे 

अकोला, दि. १३ - सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज झाली असून आता या पद्धतीचे लोणं वाढते आहे. अकोल्यात मात्र अशा विवाहांसोबतच तुळशी विवाह सुद्धा सामुहिक पद्धतीने साजरा केला जात आहे.
अकोला येथील खेडकर नगर मध्ये संत तुकाराम संकुल येथील रहिवाशी प्रत्येकाच्या घरी तुलसी विवाह न करता सर्वांनी मिळून हा सोहळा साजरा करतात. हा सामूहिक विवाह मागील ३ वर्षा पासून करतात. प्रत्येकाच्या घरातील तुळशी आणले जातात, घराघरातील देवघरामधील कृष्णाची मुर्ती सुद्धा तुळशी समोर आणली जाते मग सुरू होतो विवाह सोहळा, आंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात. लग्न सोहळा संपला की सर्वाच्या घरातून आलेला प्रसाद एकत्र करून सर्वांना वाटला जातो. असा सामुहिक तुळशी विवाह मोठया उत्साहात साजरा होतो केवळ तुळशी विवाहच नाही तर प्रत्येक सन हे सामूहिक पणे साजरा करतात हरतालिका, संक्रांतहळदी, कुंकू कोजागिरी, एक गणपती, एक दुर्गा देवीची स्थापना अशा अनेक उत्सवात ह्यसामुहिकह्ण ही कृती कायम असते. विशेष म्हणजे हे सर्व सन फक्त महिलांच्या वतिनेच साजरे केले जातात. यामध्ये प्रतिभा भालतीलक, वैशाली भोरे, शीतल ठाकरे, अर्चना ठाकरे, सोनू म्हैसने, कीर्ती सदफळे, समृद्धी भालतिलक, सौ लोथे, सौ काटोले आदींचा सहभाग असतो.

https://www.dailymotion.com/video/x844hqb

Web Title: VIDEO - Tulsi marriage also a community in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.