VIDEO : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडी नाल्यात कोसळून २ ठार, ६ जखमी
By admin | Published: September 7, 2016 09:53 AM2016-09-07T09:53:10+5:302016-09-07T10:10:07+5:30
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार नाल्यात कोसळून २ ठार तर ६ जखमी झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
लोणावळा , दि. ७ - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली सुमो कार सिमेंटचा कठडा तोडून नाल्यात कोसळल्याने २ जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिकांच्या मध्ये असणार्या गार्डनमधील नाल्याचा सिमेंट कठडा तोडत नाल्यात कोसळली. बुधवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास तुंगार्ली गोल्ड व्हँलीजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश असून जखमींमध्ये १ पुरुष, २ महिला, २ मुले व एका मुलीचा समावेश असून ते सर्वजण गोरेगाव मुंबई येथील असल्याचे समजते.
दोन वर्षांपूर्वी याच नाल्यात पोलीसांची एक व्हॅन देखिल पडली होती. सदर अपघाताच्या ठिकाणी महामार्ग पोलीसांनी शास्तोक्त पध्दतिुचा कठडा व क्रँश बँरियर आदी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत त्यावेळी पत्र दिले होते. मात्र त्यानंतरही आयआरबीने योग्य खबरदारी या ठिकाणी घेतलेली नाही. दोन वर्षापुर्वी महामार्गावर सर्वत्र काँरीडोरच्या दुतर्फा ब्रायफ्रेन रोप लावण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती. मात्र अद्यापही ते काम पुर्ण न झाल्याने आजची घटना घडली आहे. अपघातग्रस्त ठिकाणी केवळ प्लास्टिकचे ड्रम उभे करण्यात आले होते. तेथे डब्लू आकाराचे क्रँश बँरीयर अथवा ब्रायफ्रेन रोप असता तर ही दुर्घटना ठळली असती. घटनेची माहिती समजताच महामार्गचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळाला भेट देत पहाणी केली.