VIDEO - प्रतिमेच्या विटंबनेमुळे दोन गावात तणाव !
By admin | Published: October 14, 2016 04:31 PM2016-10-14T16:31:58+5:302016-10-14T23:14:40+5:30
बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुनर्वसीत सुकळी पैसाळी येथे शुभेच्छा फलकावरील महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर, या गावातील एका गटाने चांगेफळ
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 14 - बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुनर्वसीत सुकळी पैसाळी येथे शुभेच्छा फलकावरील महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर, या गावातील एका गटाने चांगेफळ पैसाळी या शेजारच्या पुनर्वासीत गावातील घरांवर सशस्त्र हल्ला केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास घडली. चांगेफळ पैसाळी गावातील लोक झोपेत असतानाच हा हल्ला करण्यात करण्यात आला. हल्लेखोरांनी महिलांना तसेच जनावरांना मारहाण करीत, घरांची नासधुस केली. त्यांनी वाहनांचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली. जमाव एवढा प्रक्षुब्ध झाला होता, या प्रकरणात पोलिसांनी ४५ आरोपींना अटक केली.
चांगेफळ पैसाळी आणि सुकळी पैसाळी ही दोन्ही गावे पुनर्वसीत असून, या दोन गावांच्या मध्ये केवळ एक रोड आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थ कोणताही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रम या रोडवर साजरा करतात. सुकळी पैसाळी येथील एका युवकाने याच रस्त्यावर मांस विक्रीचे दुकान लावले; मात्र नवरात्रोत्सवात मांस विक्रीचे दुकान बंद ठेवावे, अशी मागणी चांगेफळ पैसाळी येथील महिलांनी केली. या कारणावरुन दोन्ही गटात गत १० दिवसांपासून वाद सुरू झाला होता.
दोन गटात दररोज वादाची धुसफुस सुरूच असताना, शुक्रवारी पहाटे सुक ळी पैसाळी गावातील १०० ते १५० पुरुष महिलांच्या जमावाने, चांगेफळ ़पैसाळी गावातील एका विशिष्ट गटातील घरांवर सशस्त्र हल्ला चढविला. दुसºया गटातील ग्रामस्थ झोपेत असतानाच हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी महिला, पुरुष, लहान मुले व वृद्धांना मारहाण केली. त्यानंतर घरातील दिसेल त्या वस्तूंची तोडफोड केली तसेच घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. यावेळी एका गटातील महिलांनी दुसºया गटातील महिलांना घेरुन मारहाण केली. हल्लेखोरांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही लंपास केल्याचाही आरोप महिलांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला. यासोबतच बहुतांश घरातील दागिने व रोख रक्कमही हल्लेखोरांनी लंपास केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी ७० च्यावर हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वृत्त लिहिस्तोवर ४५ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर लुटमारीसह दंगल घडविणे, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.