VIDEO : मस्जिद बंदरजवळील आग नियंत्रणात, वाहतूक संथगतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 06:46 PM2017-01-23T18:46:18+5:302017-01-23T20:52:36+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 23 - मस्जिद बंदर स्थानकाजवळील दानाबंदर एलएलसी कम्पाऊंड येथील गोडावून णि झोपडपट्टीला आज संध्याकाळी लागलेली ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मस्जिद बंदर स्थानकाजवळील दानाबंदर एलएलसी कम्पाऊंड येथील गोडावून णि झोपडपट्टीला आज संध्याकाळी लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तसेच आग लागल्यापासून थांबवण्यात आलेली मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या आगीत सहा मुले जखमी झाली असून, त्यांना उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संध्याकाळी ट्रॅकशेजारील झोपडपट्टीला आग लागल्यावर मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आली होती. संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळीच लोकलसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल होत होते. तसेच सीएसटी, दादर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आगीची तीव्रता पाहून मस्जिद बंदर ते सीएसची दरम्यानचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच बेस्टकडून अतिरिक्त बसेसची सेवा सुरू करण्यात आली.
आज संध्याकाळी सहाच्या सुमारास मस्जिद बंदर आणि सीएसटी स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकशेजारील झोपडपट्टीला ही आग लागली. त्यानंतर रौद्र रूप घेत ही आग एलएलसी कम्पाऊंडमध्ये पसरत गेली. मात्र या आगीचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी 12 फायर इंजिन आणि आठ वॉटर टँकर घटनास्थळी पाठवण्यात आले. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
{{{{dailymotion_video_id####x844pa8 }}}}
#FLASH Mumbai: Fire beaks out in slums of Narsi Natha Street in Masjid Bunder East. 8 fire tenders at the spot. More details awaited. pic.twitter.com/8JL2r8FWCU
— ANI (@ANI_news) 23 January 2017