VIDEO : गणेशोत्सवासाठी सर्रासपणे पीओपी मुर्तीचा वापर

By admin | Published: August 27, 2016 02:35 PM2016-08-27T14:35:49+5:302016-08-27T15:36:23+5:30

गणेशोत्सव जवळ येत असून अनेक सामाजिक संस्था पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपुरक शाडूच्या मूर्ती घडविण्यास सांगत आहेत.

VIDEO: The use of POP figures widely for Ganeshotsav | VIDEO : गणेशोत्सवासाठी सर्रासपणे पीओपी मुर्तीचा वापर

VIDEO : गणेशोत्सवासाठी सर्रासपणे पीओपी मुर्तीचा वापर

Next
- ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ -  गणेश उत्सव जवळ येऊ लागला आहे. यास्तव विविध सामाजिक संस्था आणि शासनाच्यावतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपुरक शाडूच्या मूर्ती घडविण्यासह, निर्माल्याचे विसर्जन पाण्यान करता त्याची रितसर विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु त्यांच्या आवाहनाचा कसलाही परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी केवळ प्लास्टर आॅफ पॅरिसपासूनच मूर्ती बनविण्याचे काम सुरू असल्याचे आढळत आहे. 
गणेशोत्सव हा महाराष्ट्राबरोबरच देशाच्या अनेक भागातील धार्मिक, सांस्कृतिक महोत्सव आहे. परंतु या महोत्सवाचे स्वरूप अलिकडे फारच बदलून गेले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीची संख्या वाढली आहे. पूर्वी मूर्तीकार शाडूच्या मूर्ती तयार करत असत. त्या मूर्तींना दिलेले रंगही साधे असत. परंतु सार्वजनिक गणेश मंडळे वाढली आणि गणपतीच्या मूर्तींची मागणीही प्रचंड वाढली. त्यामुळे वाढत्या मागणीनुसार मूर्ती बनवणे, मूर्तीकारांनाही अशक्य होऊन बसले. त्यावर उपाय म्हणजे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणे. या मूर्ती तयार करण्यास फार वेळ लागत नाही. त्यातच वजनाला हलक्या आणि मातीच्या मूर्तीपेक्षा तुलनेने निम्म्या किमतीत मिळत असल्याने पीओपीच्या मूर्ती मोठया प्रमाणात तयार व्हायला लागल्या आणि त्यांची विक्रीही प्रचंड वाढली. पीओपीवर रंगही छान बसतात आणि ती मूर्ती अधिक आकर्षक दिसते. म्हणून त्याच मूतीर्ची खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे. लोकांना त्यांचे दुष्परिणाम मोठे आहेत. या मूर्ती पर्यावरणदृष्टया अतिशय घातक असतात याची माहिती आता लोकांना सांगण्याची गरजही राहिली नाही. पीओपी पाण्यात विरघळत नसल्याने अशा मूर्तीचा गाळ विहीरी, नद्या, तलाव आदि जलाशयांच्या तळात साचतो. त्यामुळे तलाव, विहिरीतील पाण्याखालचे जीवंत झरे बंद होतात. प्लास्टर आॅफ पॅरिसचा थर पाण्यामध्ये तयार होतो आणि जलाशये उथळ होतात. नंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलाशयाची क्षमता कमी झाल्यामुळे त्यात पाणी साठत नाही. थोडयाशा पावसाने जलाशये भरतात आणि भरपूर पाणी साठवण्याऐवजी वाहून जाते. त्याशिवाय गणेश मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण होऊन जलचरांना धोका निर्माण होतोे,असे पीओपीचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र सरकारकडे अशा मूर्तीवर बंदी घालावी, अशी मागणीही केली होती. परंतु महाराष्ट्रात त्या दृष्टीने हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे आजही अनेक मूर्तीकार सर्रासपणे प्लास्टरच्या मूर्ती घडविण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात थेट मूर्तीकारालाच विचारले असता मातीची फुटाची मूर्ती घडविणे कठीण, माती मिळविणेही कठीण आणि एवढे सगळे करूनही मातीची मूर्ती बनविली, तर साधारण अडीच फू ट मातीची मूर्ती ही ८ ते ९ हजारांची असते, तर त्याहून दुप्पट उंचीची मूर्ती त्यापेक्षा कमी किंमत असल्याने लोक मातीची मूर्ती विकत घेत नाहीत. त्यामुळे आम्ही मातीच्या मूर्ती घडवून उपाशी मरावे काय, असे त्याने सांगितले. तथापि, जलप्रदूषण पर्यावरण रक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारनेही पीओपीवर बंदी घालणे, ही आता काळाची गरज बनली आहे.

Web Title: VIDEO: The use of POP figures widely for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.