VIDEO : वेंगुर्ला समुद्र किनारी महाकाय देवमासा आढळला
By Admin | Published: October 8, 2016 01:45 PM2016-10-08T13:45:27+5:302016-10-08T13:49:37+5:30
वेंगुर्ला मूठ समुद्रकिनारी 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळीम हाकाय मासा लाठावर तंरगताना दिसला
ऑनलाईन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. ८ - वेंगुर्ला मूठ समुद्रकिनारी 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी महाकाय देवमासा लाठावर तरंगताना दिसला होता. रात्री 8 च्या सुमारास तो मुठवाडी किनाऱ्याला लागल्याची माहिती येथील सागर तटरक्षक दलाचे सदस्य गजानन कुबल व संकेत तोरसकर यांनी वेंगुर्ला पोलिसांना दिली.
पोलिसांनी वनविभागाला कळविले असता वनविभागाचे अधिकारी शनिवारी सकाळी मूठ किनारी दाखल झाले. वनविभागाने सदर मृत देवमाशाचे मोजमाप केले. सदर महाकाय मादी मासा 80 ते 90 वर्षाचा असून वजन सुमारे 4 टन आहे. यावेळी वनविभागाचे मठ वनपाल रामचंद्र मडवल, वनरक्षक सुरेश मेतर, तुळस वनरक्षक सूर्यकांत सावंत, वन कर्मचारी शंकर पाडावे, संतोष इब्रामपुरकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल अमोल धुरी आदिनी पंचनामा केला. सदर महाकाय देवमासा पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती.